हिंगनघाट येथे टीपू सुलतान जयंती साजरी करण्यात आली

Fri 22-Nov-2024,03:59 AM IST -07:00
Beach Activities

अब्दुल कदीर बख्श 

टीपू सुलतान तोफा, लष्करी तंत्रज्ञान वापरणारे पहिले भारतीय शासक- पठाण

हिंगनघाट:- वर्धा जिल्यातील हिंगनघाट येथील निशानपुरा वार्ड गुरूवार २१ नोव्हेंबर रोजी टिपू सुलतान यांची जयंती विविध मान्यवरांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित समाजबांधव आणि हिंगनघाट नागरिकांच्या वतीने टिपू सुलतान यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आणी मोठे जल्होद उत्सव रैली काढण्यात आली.टिपू सुल्तान यांचा जन्म २० नोव्हेंबर १७५१ रोजी कर्नाटकातील देवनहल्ली येथे झाला होता. ते म्हैसूर राज्याचे शासक होते, त्यांच्या धाडस आणी युध्द-कौशल्यासाठी ते प्रसिद्ध होते. त्यांना टायगर ऑफ म्हैसूर म्हणून ओळखले जाते.१९८२ साली हैदर अलीच्या मृत्यूनंतर टिपू सुलतानाने म्हैसूरचे कारभार सांभाळला. त्यांना प्रशासनात सुधारणा केल्या आणि शेतकऱ्यांच्या भल्यासाठी अनेक उपाय योजना केल्या ते आधुनिक तोफा आणि लष्करी तंत्रज्ञान वापरणारे पहिले भारतीय शासक होते. टिपू सुलतान यांनी ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध चारवेळा युध्दे लढली. पहिले युध्द आणि दुसरे युध्द इंग्रजांविरुद्ध धाडसी लढाया देउन इंग्रजांना आव्हान दिले होते. तिसरे युध्द इंग्रजांनी अनेक प्रांत काबीज केले, परंतु टिपू सुलतान यांनी त्यांची झुंज कायम ठेवल्याचे पठाण म्हणाले.