मतमोजणीकरीता यंत्रणा सज्ज कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण
शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
चंद्रपूर: बल्लारपूर येत्या शनिवारी २३ नोव्हेंबर ला जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात मतमोजणी होणार आहे. या मतमोजणीकरीता जिल्हा प्रशासनासह संबंधित विधानसभा मतदारसंघातील संपूर्ण यंत्रणा सज्ज असुन याबाबत कर्मचारी यांचे प्रशिक्षणसुद्धा घेण्यात आले.महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर ला मतदान पार पडले.उद्या २३ नोव्हेंबर ला मतमोजणी होणार आहे.याकरीता संबंधित विधानसभा मतदारसंघात तयारी झाली आहे.यात चंद्रपूर मध्ये मतमोजणीचे सर्वाधिक २८ फेऱ्या तर बल्लारपूरमध्ये २७ फेऱ्या होणार.विधानसभानिहाय टेबल आणि राउंडची संख्या:७०- राजुरा विधानसभा मतदारसंघात मतमोजणीकरीता एकुण १४ ईव्हीएम टेबल,२५ फेऱ्या आणि १० पोस्टल बँलेट टेबल राहणार आहे. ७१ - चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात मतमोजणी करीता १४ ईव्हीएम टेबल,२८ फेऱ्या आणि १० पोस्टल बँलेट टेबल, ७४ - चिमुर विधानसभा मतदारसंघात मतमोजणी करीता १४ ईव्हीएम टेबल,२३ फेऱ्या आणि ६ पोस्टल बँलेट टेबल,तर ७५ -वरोरा विधानसभा मतदारसंघात मतमोजणी करीता १४ ईव्हीएम टेबल,२५ फेऱ्या आणि १० पोस्टल बँलेट टेबल राहणार आहेत र्ठिकाणी होणार मतमोजणी : राजुरा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय, राजुरा येथे, चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी तहसील कार्यालय, चंद्रपूर येथे, बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी उपविभागीय अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत मुल येथे, ब्रम्हपूरी विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी शासकीय तंत्रनिकेतन, नागभीड रोड, ब्रम्हपूरी येथे, चिमूर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी राजीव गांधी सभागृह, उपविभागीय अधिकारी कार्यालय परिसर चिमूर येथे आणि वरोरा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी कृषी उत्पन्न बाजार समिती, गोडावून क्रमांक २ मोहबाळा रोड वरोरा येथे होणार आहे.
कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण : मतमोजणी संदर्भात तहसील कार्यालय, चंद्रपूर येथे उजळणी प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी चंद्रपूरचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संजय पवार, सहायक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार विजय पवार, सीमा गजभिये व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी नायब तहसीलदार सचिन खंडाळे यांनी सादरीकरणातून उपस्थितांना प्रशिक्षण दिले.