देवळी विधान सभा क्षेत्रात ३३५,मतदान केंद्रे आचारसंहितेचे सर्वांनी पालन करावे-प्रियंका पवार

Wed 16-Oct-2024,09:54 PM IST -07:00
Beach Activities

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर 

 

 

देवळी निवडणूक निर्णय अधिकारी प्रियंका पवार यांची पत्रपरिषदेतून माहिती विधान सभेच्या निवडणुका जाहीर होताच शासकिय यंत्रणा कामाला लागली असून देवळी विधान सभा निवडणूक निर्णय अधिकारी प्रियंका पवार (कर्डिले) यांनी देवळी येथील तहसील कार्यालयात पत्रपरिषद घेऊन निवडणूकीच्या संदर्भात माहिती दिली.

आचारसहिता लागू झाली असून सर्वांनी त्याचे पालन करावे आणि शासनाला सहकार्य करण्याचे आव्हान केले देवळी विधान सभा निवडणूकी मध्ये मतदान करण्याकरीता ३३५ मतदान केंद्र राहणार आहे.

मतदाराची संख्या २ लाख ७३ हजार ६७७ आहे.मतदानाची टक्केवारी वाढण्याकरीता मतदारामध्ये जन जागृती करण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे जेष्ठ नागरीकांना मतदान करण्याकरीता त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे.तसेच ८५ वर्षावरील मतदाराच्या घरी भेटी देहून त्याचे मतदान करुन घेण्याकरीता विशेष लक्ष देण्यात येणार आहे. मतदान केंद्रावर सर्व सोई व सुविधा याची काळजी घेण्यात येणार आहे त्याकरिता मतदान केंद्राची पाहणी सुरु आहे. व मतदान केंद्रावर असलेल्या उणिवा दूर करण्यात येणार आहे. महसूल कर्मचारी,शासकिय कर्मचारी व अधिकारी तसेच पोलीस अधिकारी गृहरक्षक, शिक्षक, निवडणूक व्यवस्थीत पार पाडण्याची जबाबदारी प्रत्येकाला सोपविण्यात येणार आहे.

  मतमोजणी देवळी येथे होणार असून मतमोजणी करीता १४ टेबल लावण्यात येणार आहे.विधानसभा क्षेत्रातील ३८ झोन मधील मतदान पेट्या गोळा करण्यात येतील प्रत्येक मतदान केंद्रावर १३०० ते १४०० मतदाराची संख्या मतदान करतील व प्रत्येक उमेदवारास नामर्निदेश पत्र भरताना आपल्यावरील गुन्ह्याची माहिती व मालमत्ते विषयी माहिती देणे आवश्यक राहणार आहे.लोक सभेत झालेल्या मतदान टक्केवारीत पेक्षा यावेळी टक्केवारीत वाढ करण्याकरीता प्रयत्न करण्यात येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रियंका पवार यांनी यावेळी सांगितले.

लोक सभेच्या वेळेवर मतदान केंद्रावर सुविधेचा अभाव व कार्यकत्यांची धांदलबाजी यावेळी पत्रकारांनी लक्ष वेधले असता यावरून कोणाकडूनही नियमाचे उल्लंगन याची दक्षता घेतली जाणार असल्याचे प्रियंका पवार यांनी सांगितले.

तसेच यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार समर्थ शिरसागर यांची उपस्थीती होती.