महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेची अकोला शहरातील मेहरे नगर येथे शाखा उदघाटन
प्रतिनिधी साजिद पठान नागपुर
अकोला -महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने अकोला जिल्ह्यात पक्ष बळकट करण्याकरिता महिला सेनेने कंबर कसली असून प्रत्येक प्रभागात महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेची शाखा उघडण्याचा संकल्प घेऊन येत्या काही महिन्यात अकोला जिल्हा पिंजून पूर्ण करण्याचा निर्धार महिला जिल्हा अध्यक्ष प्रशंसा मनोज अंबेरे यांनी घेतला याची सुरुवात अकोला पश्चिम मतदार संघापासून सुरू करण्यात आली.
दिं.०८.०९.२४ रोजी मेहरे नगर येथे मोठ्या उत्साहात शाखेचे उद्घाटन महिला सेना जिल्हाध्यक्ष अकोला प्रशंसा मनोज अंबेरे यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी शहर उपाध्यक्ष रूपाली गमे,रजनी भारसाखळे शाखाध्यक्ष पदी,अनिता डिघेकर शाखा उपाध्यक्ष,विदया लाहोळे शाखा सचिव तर शाखा सदस्य लता दुबे,अनुराधा देशमुख,संगिता भगत, कु.अंजली दुबे,गंगा सोमवंशी,अंजली राजवैदय,शिल्पा चेडे,रेणुका कुलकर्णी,पुजा मंडलीक यांच्यासह सुलोचना उमाळे, लता शहा, नंदा शेळके, लता हिंगणे, आशा बुलबुले, अनिता गजघाटे, मिना यादव, सारिका नागरीकर,गौरी देवगिरीकर, प्रिती गजघाटे, कविता झाडोकार, रेखा पाटील सुनिता राठोड आदी महीला कार्यकर्त्यां मोठया प्रमाणात उपस्थित होत्या.