गरजू रुग्णांच्या मदतीला धावून आले शिवसैनिक

Fri 11-Oct-2024,12:20 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी = पवन ढोके 

 

वरोरा:- शिवसेना प्रमुख हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण या प्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सामाजिक कार्य करत आहे.पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे,युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे,संजय राऊत,पूर्व विदर्भ संपर्कप्रमुख आमदार भास्कर जाधव,युवासेना शिवसेना सचिव वरुण सरदेसाई,प्रदेश कार्यकारिणी सदस्य शीतल सेठ,हर्षल काकडे, पूर्व विदर्भ सचिव नीलेश बेलखेडे,यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रमुख र विन्द्र भाऊ शिंदे व युवासेना जिल्हाप्रमुख रोहण कुटेमाटे यांच्या आदेशानुसार शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेना वरोरा भद्रावती विधानसभा तर्फे शिवसेना रक्तदूत म्हणून गरजू रुग्णांना शिवसैनिक रक्तदान करतो. जिल्हाप्रमुख रविन्द्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा मध्ये शिवसेना सामाजिक कार्य करत आहे 

.त्यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर AIIMS मध्ये अनिकेत रोकडे या रुग्णाला रक्ताची अत्यंत आवश्यकता होती त्यांचा कॉल येताच विधानसभा प्रमुख युवासेना अभिजित कुडे यांनी तात्काळ शिवसैनिक वैभव पुसदेकर, महेश नरांजे यांना कॉल केला व तात्काळ नागपूर येथे जाऊन रूग्णांना रक्त दिले व कोणत्याही परिस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे असा आधार दिला तसेच त्यांची योजना चालू करून दिली. कुणालाही रक्ताची मदत लागल्यास युवासेना तत्पर आहे असे अभिजीत कुडे यांनी म्हटले. रुग्णाच्या नातेवाईकांनी जिल्हाप्रमुख रविन्द्र शिंदे व विधानसभा प्रमुख युवासेना अभिजित कुडे यांचे आभार मानले.