उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट यांच्या पथकाची रेती माफिया विरुद्ध केलेली कारवाई

Fri 11-Oct-2024,11:02 PM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी:आसीफ मलनस हिंगणघाट

             

 

 

 

हिंगणघाट:दि11-10-2024 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट यांच्या पथकातील पोलीस हवालदार नरेंद्र डहाके, अश्विन सुखदेवे ,पोलीस शिपाई आकाश कांबळे, राकेश इतवारे यांना मुखबीर कडुन खाञीशीर खबर मिळाली की आरोपी (1) गोकुल गंगाराम पट्टावी, रा. पोंडी, ता. बैहर, जि. बालाघाट(मध्य प्रदेश) हा आरोपी क्र (2) श्याम सातपुते ,रा. दत्त मंदिर वॉर्ड, हिंगणघाट याचा सांगणे वरून त्याच्या ताब्यातील लाल रंगाच्या ट्रॅक्टर मध्ये वना नदीच्या पात्राचे जुनोना घाट येथून काळी रेती चोरी करून शाहलंगडी मंदिर ते रिमडोह कडे जाणाऱ्या रोड ने जात आहे अश्या मुखबीरचे खबरे वरुन पंच व पो.स्टॉप चे मदतीने यातील नमुद आरोपी क्र 1 च्या ताब्यातील लाल रंगाचा महेंद्र कंपनी चा ट्रॅक्टर क्र MH 32 TC 025 यास थांबवून चेक केले असता 1 ब्रास काडी रेती( गौण खनिज) बिना रॉयल्टी वाहतूक करताना रंगेहाथ मिडून आल्याने जागीच सविस्तर मौक्का जप्ती पंचनामा कारवाई करून ट्रॅक्टर, ट्रॉली व 1 ब्रास काडी रेती (गौन खनिज ) असा जु कि 7,57,000/- रु चा माल मिडून आल्याने , पो स्टे परत येवुन आरोपीतान विरूध्द गुन्हा नोंद केला       

          सदरची कार्यवाही मा.पोलीस अधिक्षक श्री अनुराग जैन साअप्पर पोलीस अधिक्षक सागर कवडे सा.मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट रोशन पंडित सा यांचे निर्देशाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी सा हिंगणघाट यांचे पथकतील .पोलीस हवालदार नरेंद्र डहाके,अश्विन सुखदेवे ,पोलीस शिपाई आकाश कांबळे,राकेश इतवारे यांनी केली