बंद पडलेल्या शाळेत सी.बी.एस.सी शाळा सुरु करा मुख्याधिकारी कडे मनसे ची मागणी
प्रतिनिधी :साजिद पठान नागपुर
काटोल:काटोल मध्ये गोर गरिबाच्या मुलाला शिक्षण मिळावे व तेही दर्जेदार त्या करिता स्व.विरेंद्र बाबू देशमुख यांनी काटोल शहराच्या विभिन्न भागात ऐकून 11 शाळा सुरु केल्या परंतु आता सर्व पालकाचा कल सी.बी.एस.सी शाळे कडे असल्यामुळे काटोल शहरातील नगर परिषद द्वारे सुरु असलेल्या बऱ्याचश्या शाळा बंद पडल्या आहे, त्या बंद पडलेल्या शाळा क्र 5 व शाळा क्र 11 मध्ये सी.बी.एस.सी प्याटर्न ची शाळा नो लास्ट नो प्रॉफिट या तत्त्वावर सुरु करण्या करिता काटोल नगरपरिषद चे मुख्यधिकारी धनंजय बोरीकर यांना महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना चे राज्य उपाध्यक्ष नमाजी अली,मनसे राज्य उपाध्यक्ष किशोर सरायकर ,नागपूर जिल्हा संघटक दिलीप गायकवाड,शेतकरी सेना जिल्हा अध्यक्ष प्रशांत बारई, जिल्हा उपाध्यक्ष अरुण कोल्हे, तालुका अध्यक्ष अनिल नेहारे विक्रम सावळकर यांनी निवेदन दिले व या निवेदनावर लवकरात लवकर अंबल बजावणी करण्याचे आश्वासन मुख्यधिकारी यांनी दिले!