सेलू नगर पंचायत मध्ये " अग्नीशमन " वाहनाचा लोकार्पण सोहळा करण्यात आले

तालुका प्रतिनिधी:राज शेख सेलू
वर्धा:आज सेलू नगर पंचायत मध्ये " अग्नीशमन " वाहनाचा लोकार्पण सोहळा स्नेहलताई देवतारे अध्यक्ष न.पं.सेलू शैलेंद्र दफ्तरी,गटनेते तथा पाणि पुरवठा सभापती न. पं.सेलू यांचे हस्ते करण्यात आले या प्रंसगी राजेंद्र मिश्रा नगरसेवक, किशोर इरपाते,संदीप सांगोळकर,व सामाजिक कार्यकर्ता सलमान पठाण तथा नगर पंचायत कर्मचारी वृंद उपस्थितीत होते.राज्यातील ड वर्ग महानगरपालिका/नगरपरिषदा तसेच नगरपंचायती यांच्या अग्निशमन सेवेतील तूट भरून काढण्याकरिता व राज्यातील अग्निशमन सेवेचे सक्षमीकरण करण्याकरिता विविध आवश्यक उपाययोजना करण्याच्या महाराष्ट्र अग्निसुरक्षा अग्निसुरक्षा अभियान राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला होता त्याअंतर्गत नगर पंचायत सेलूला एक अग्निशमन वाहन मिळाले आहे. सेलू शहराला व शहराच्या लगत असलेल्या कॉटन मिल व उद्योगांला तसेच आसपासच्या गावांना ह्या वाहनाचा सुरक्षेच्या दष्टीकोनातून लाभ होईल.
Related News
महाकाली यात्रेसाठी 2 कोटी 90 लक्ष रुपयांचा निधी सोयीसुविधांसाठी विशेष प्रयत्न
3 days ago | Sajid Pathan
लोहारा येथील सिमेंट नाल्याची अवस्था खराब गेल्या पाच सहा वर्षापासून नाल्यांची साफसफाईच नाही
3 days ago | Sajid Pathan
बल्लारपूर शहरातील 2019 नंतर बांधण्यात आलेल्या सी.सी रस्ते व बाजूला बसविण्यात आलेल्या पेव्हरचा दर्जा
8 days ago | Sajid Pathan