वसमत येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा तर्फे युवा संवाद मेळाव्याचे आयोजन

Fri 11-Oct-2024,10:55 PM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी अशोक इंगोले हिंगोली 

 

 

 हिंगोली :वसमत

 येथील श्रीकृष्ण मंगल कार्यालय येथे दिनांक 11 रोजी आमदार रोहित पवार तसेच रोहित आर आर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत युवा संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते जनसभेला संबोधित करताना रोहित पवार म्हणाले की या सरकारने पैशाची उधळपट्टी करीत जाहिरातीवर तीन महिन्यात पाचशे कोटी रुपये खर्च केला या सरकारला फक्त जाहिरात करायची आहे तुम्ही कोठेही बस स्टॅन्ड ला गेले की तुम्हाला यांचे चेहरे दिसले पाहिजे मोबाईल उघडला की यांचे चेहरे दिसले पाहिजे मागे तुम्ही पाहिला असेल की युती सरकारच्या एका आरोग्यमंत्र्यांनी कुत्र्यांच्या नसबंदी मध्ये सुद्धा 600 कोटी रुपयांचे भ्रष्टाचार केले आहे असे ते म्हणाले या कार्यक्रमाच्या वेळी व्यासपीठावर माजी सहकार मंत्री जयप्रकाश दांडेगावकर जिल्हा अध्यक्ष दिलीप चव्हाण राज्य महिला उपाध्यक्ष उषा इंगोले विनोद झवर सुभाष लालपोतु शेख फारूक दिवाकर पुंडगे रत्नमाला शिंदे मुनिता राठोड शेळके चंद्रमुनी मस्के आदी मान्यवरांची उपस्थिती होती. पुढे बोलताना ते म्हणाले मतदारसंघाचं बोलायचं तर माती घ्यायची असेल तर एका माणसाला बोलावे लागते सिमेंट घ्यायचे असेल तर एका माणसाला बोलाव लागते पेवर घ्यायचे असेल तर एका व्यक्तीकडून घ्यावे लागते सर्व दुकाने घरी कमिशन घरीच अवैध धंदे बळवले आहे वाळू उपसा करून पूर्णा नदी खोल दिसत आहे या सर्व प्रकारावर जर पूर्णविराम लावायचा असेल तर आपल्याला एकत्रित यावे लागेल म्हणून तुम्ही आदरणीय दांडेगावकर साहेबांना 50 हजाराच्या च्या मताधिक्याने निवडून द्या असे ते म्हणाले

या देशाला पराक्रमी तरुणांचा फार मोठा वारसा आहे. छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू महात्मा गांधी यशवंतराव चव्हाण, असे अनेक महान योद्धे विचारवंत या देशात घडून गेले, यांच्या विचारांचा वारसाआपल्याला पुढे न्यावा लागेल, जो वारसा समतेचा विवेकाचा विज्ञानाचा असेल प्रत्येक राष्ट्राच्या उभारणीत तरुणांचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे जेव्हा जेव्हा देशावर अरिष्ट आलं संकट आलं तेव्हा तेव्हा या देशातील तरुण रस्त्यावर उतरले आणि क्रांतिकारी पाऊल उचलत अमुलाग्र बदल घडवून आणले.. म्हणूनच आज देशाच्या ढासळत चाललेल्या परिस्थितीला खचत चाललेल्या नैतिकता खोटेपणा अत्याचार अशा समस्यांना जर संपवायच भ्रष्टाचार असेल तर तरुणांनी एकत्र येऊन विचार करणं आवश्यक आहे आणि यासाठीच अशा युवासंवाद मेळाव्याची गरज आहे

केवळ भारतातच नाही तर जागतिक क्रांतीमध्ये सुद्धा युवकांचे मोठे योगदान राहिले आहे १७८९ मध्ये घडलेली फ्रेंच राज्यक्र १९१७ मध्ये रशियन राज्यक्रांती भारतीय स्वातंत्र्याचा लढा, येथील निर्भया प्रकरणाच्या न्यायासाठी दिलेला तरुणांचा युवक क्रांतीची काही उदाहरणे म्हणून घेता येतील. महाराष्ट्राच्या उभारणीसाठी तरुणांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे 

परंतु आजचा तरूण हा अनेक समस्यांच्या विळख्यात सापडलेला आहे गरीबी बेरोजगारी भ्रष्टाचार अन्याय, अत्याचार, वाढती महागाई विविध परीक्षांमध्ये होणारा गोंधळ, खचलेल्या विद्यार्थ्यांच्या आयत्या, अशा समस्यांमुळे मन विचलित होते. हा बदल घडवायचा असेल तर यासाठी तरुणांनी पुढे यायला हवं आजचा तरुण विविध समस्यांमध्ये गुरफडलेला दिसतो देशाची अर्धी लोकसंख्या असलेल्या महिला आज असुरक्षित आहेत..

तसं पाहिलं तर भारत हा जगातील सर्वात जास्त तरुण लोकसंख्या असलेला देश आहे एकूण लोकसंख्येच्या ६६% लोक ३५ वर्षाखालील आहेत. ती आपल्यासाठी जमेची बाजू आहे परंतु आजचा तरुण उदासीन आहे त्याव्या हाताला काम नाही... तो समाज माध्यमाच्या आणि व्यसनाव्या आहारी जात आहे हे सर्व बदलायचं असेल तर आपल्याला विचार करून निर्णय घ्यावा लागेल.. जो पक्ष जो नेता तुम्हाला रोजगार निर्माण करून देईल तुमच्या जगण्याचे प्रश्न त्याला स्वतःच्या जगण्याचे वाटतील यंत्रणा देण्यास जो पक्ष सक्षम असेल अशा पक्षाच्या पाठीशी भे रहाणे, सत्याच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक आहे. आज कोणत्या वळणावर जात आहे याचा विचार करण्याची वेळ आली आहे असे ते म्हणाले यावेळी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तालुक्यातील असंख्य नागरिक हजारोच्या संख्येने उपस्थितहोते.