वर्धा जिल्हा कांग्रेस पक्षा ची विधानसभाच्या पार्श्वभूमीवर मुलाक़ात पार पडली
प्रतिनिधि अथर शेख वर्धा
वर्धा:आज वर्धा येथील काँग्रेस जिल्हा मुख्यालय येथे आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छूक उमेदवारांची मतदारसंघ निहाय मुवर्धालाखत वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. मनोज चांदुरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
काँग्रेस पक्षाने या निवडणुकीत जनतेच्या आकांक्षांना आणि गरजांना केंद्रस्थानी ठेवून एक मजबूत आणि प्रामाणिक उमेदवारांची टीम उभी करण्याचा संकल्प केला आहे. या बैठकीत सर्व नेत्यांनी विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा केली, ज्यात स्थानिक समस्या, विकासाचे मुद्दे, आणि राज्याच्या भविष्यासाठी आवश्यक असलेले परिवर्तन यावर विशेष भर देण्यात आला.
उमेदवार निवड प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि काटेकोरपणे पार पडत आहे. आम्ही या प्रक्रियेत जनतेचे हित लक्षात घेत आहोत, आणि एकजुटीने कार्य करण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रत्येक मतदारसंघात एक असा उमेदवार उभा करायचा आहे, जो जनतेशी नाळ जुळवून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सक्षम आणि तत्पर असेल. आम्ही अशा नेत्यांना संधी देत आहोत, जे केवळ मतांसाठी नव्हे, तर महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी झटतील.
आगामी निवडणुक काँग्रेससाठी अत्यंत महत्वाची असून, जनता हाच केंद्रबिंदू मानून आम्ही प्रचाराच्या मार्गावर पुढे जाणार आहोत. काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते हे महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी सदैव सज्ज आहेत आणि या निवडणुकीत जनतेला विकासाचा खरा पर्याय निवडण्याची संधी मिळणार आहे.