काटोल विधानसभेची महविकास आघाडीने मोठ्या मनाने शे.का.प.ला तिकीट द्यावी
प्रतिनिधी:राहील शेख काटोल
काटोल:काटोल विधानसभेची महाविकास आघाडीने मोठ्या मनाने शे.का.प. ला तीकीट द्यावी.राहुल देशमुख.
लवकरच विधान सभेची निवणूक येणार असून पुढील काटोल नरखेड विधान सभेचा उमेदवार मीच म्हणून सर्वच पक्षाचे उमेदवार आपली ताकद तिकीट मिळावी म्हणून प्रयत्न करीत आहे. आमच्या प्रतिनिधींनी राहुल देशमुख यांची नुकतीच भेट घेऊन पुढील काळात आपण कोणती भूमिका पारपाडणार असे विचारले अस्ता राहुल देशमुख यांनी आता मला म्हणजेच शे.का.प. साठी अनिल देशमुख यांनी मोठ्या मनानी तिकीट द्यावी कारण आता पर्यंत राका व शेकाप ची आघाडी असल्यामुळे शेकापनी आपली पूर्ण ताकद लाऊन रा का चे अनिल देशमुख यांना निवडून आणले ते आता 80 वर्षा च्या जवळ पास पोहचले आहेत मी त्यांच्या करिता किती तरी सभा गाजवल्या त्यांचा प्रचार केला मी कोणतीही अपेक्षा ठेवली नाही पण आता त्यांचा मुलगा सलील पण तिकीट मागत आहे . तो माझा पेक्षाही वयाने लहान आहे, मग त्याचा विचार होतो तर माझा का नाही? मी अनेक वर्षा पासून राष्ट्रवादी शरद पवार गटा सोबत आघाडी असल्या मुळे मी काम केले .पण त्यांनीही आता मोठ्या मनाने मला विधान सभेची तिकीट देऊन आपला मोठे पणा दाखवावा ,आशिष देशमुख पण भा ज प ची तिकीट वर लढण्याची तयारी दाखवत आहेत त्यावर त्यांची प्रतिक्रिया विचारल्यावर ते म्हणाले काटोल नरखेड च्या मतदारांनी त्यांना एक चान्स दिला होता. पण त्यांनी मधेच मतदार संघाला पोरका करून दिला आमदारकीचा राजीनामा दिला. तेव्हा हा विचार करायला पाहिजे होता की येथील बेरोजगार युवकांसाठी काहीतरी केले पाहिजे आणि आता परत या विधानसभा साठी कोणती जादू करून येथील युवकांसाठी रोजगार निर्मिती करणार व आमदार इस पार या ऊस पार( म्हणजेच एकाच घरी भिंतीच्या इकडे कि तिकडे) हि खेळी करणार आहे फक्त यांच्या कडेच सत्ता का पाहिजे? पाहिले आपण नंतर पुतण्या व आता मुलगा हेच चालणार काय ? या वरून सुज्ञ मतदारांनी विचार करायला पाहिजे .