दिवाळी सणाच्या दिवसात अधिकारी कर्मचा-यांच्या रजा मंजूर करु नये

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या निवडणूकीचा कार्यक्रम आयोगाकडून लवकरच घोषित होणार आहे. निवडणूक कार्यक्रमाच्या कालावधीत दिवाळी हा सण येत असल्याने या कालावधीत अधिकारी कर्मचारी दिवाळीची सुटी घालविण्याकरीता बाहेर गावी जातात त्यामुळे सर्व विभाग प्रमुखांनी आपल्या अधिनस्थ असलेल्या अधिकारी व कर्मचा-यांच्या कोणत्याही प्रकारच्या रजा मंजूर करु नये, अशा सुचना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या नोडल अधिका-यांच्या बैठकीत सर्व विभाग प्रमुखांना दिल्यात.
Related News
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चंद्रपूर जिल्हा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेत बदल
09-Jan-2025 | Sajid Pathan
देशाच्या संरक्षणात सैनिकांचे योगदान महत्त्वपुर्ण-जिल्ह्याधिकारी विनय गौडा
14-Dec-2024 | Sajid Pathan