मोवाड येथे एकाचा शेतातून घरी परत येतांनी अपघाती मृत्यू,पुंडलिक गणपतराव कनिरे असे मृत व्यक्ती चे नाव

Mon 14-Oct-2024,06:02 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी: उज्वल पाटील नरखेड 

 

 

 

 

मोवाड: मोवाड येथे आज पुंडलिक गणपतराव कनिरे वय 55 हे आज दिनांक 14/10/2024 शेतामध्ये गेले होते त्याचं शेत खडकपेंड गोधनी शिवरा कडे असून अंदाजे 11 ते 12 वाजता चा दरम्यान पाऊस सुरु असतांनी पुंडलिक गणपतराव कनिरे स्वतःच्या मोटरसायकल ने घरी परत येत होते तेव्हा शेता तुन घरी परत येतांना आभाळातून वीजेचा आवाज अतिशय जोरात झाल्या मुळे ते घाबरून मोटारसायकल ने रोड वर आदळले व त्यामुळे त्यांचे अपघाती निधन झाले.यामुळे कनिरे परिवारावर संकट कोसळले घटनास्थळी शेतमजूर तिथे हजर होते शेतमजुरांना अपघात झाल्याचा दिसताच शेतमजूर यांनी गावात फोन द्वारे घटना सांगितली त्या नंतर गावकरी नागरिकांनी घटनास्थळ गाठलं नागरिकांना पुंडलिक गणपतराव कनिरे हे मृत अवस्थेत आढळून आले त्या नंतर पुंडलिक गणपतराव कनिरे यांचा मृतदेह रुग्णवाहिकेत टाकून घरी आणण्यात आला पुंडलिक गणपतराव कनिरे यांच्या परिवारात त्यांच्या पत्नी:राधा पुंडलिक कनिरे

दोन मूल व दोन मुली आहे.मुलगा:1) गणेश पुंडलिक कनिरे,2) रोशन पुंडलिक कनिरे

मुलगी:1) वनिता,2) रत्नमाला मोवाड वार्ड क्र. 6 येथील रहिवासी आहे.