उपविभागीय अधिकारी कार्यालय हिंगणघाट येथे बैठकीचे आयोजन
तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर
*अल्लीपूर येथील भोगवटदार
वर्ग २ मधे असणाऱ्या शेतजमिनी वर्ग १ मधे करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी व आमदार रणजीतदादा कांबळे यांना निवेदन देण्यात आले होते,या संदर्भात आदरणीय आमदार रणजीत दादा कांबळे यांच्या सूचनेवरून आज उपविभागीय अधिकारी कार्यालय हिंगणघाट यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते,यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीरबाबू कोठारी,राष्ट्रवादी युवक कांग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष सचिन पारसडे,शिवसेना नेते गोपाल मेघरे,शिवराया संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नितीन सेलकर व शेकडो शेतकरी उपस्थित होते,यावेळी सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच कॅम्प लावून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन यावेळी उपविभागीय अधिकारी हिंगणघाट यांनी दिले,यावेळी अल्लीपूर गावाला २ तलाठी साझ्यात रुपांतर करुन स्थायी तलाठी द्यावे तसेच नायब तहसीलदार पदाची निर्मिती करुन स्थायी नायब तहसीलदार द्यावे,या आशयाचे स्मरणपत्र देवून दिनांक ८ ऑक्टोंबर २०२४ रोज मंगळवारला तलाठी कार्यालयाच्या पायरीवर बसून ‘सत्याग्रह आंदोलन’ करण्याचा ईशारा देण्यात आला…*