जिल्हा स्तरीय टेंग-सू-डो स्पर्धेत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी.

Tue 01-Oct-2024,10:48 PM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी साजिद पठान नागपुर 

जलालखेडा (त.1)जलालखेडा येथील माँ नर्मदा सभागृह येथे दोन दिवसीय जिल्हा स्तरीय कराटे स्पर्धा संपन्न झाली. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी, नागपूर यांनी या स्पर्धेचे आयोजन केले. मनपा व जिल्हा स्तरीय शालेय टेंग- सू-डो स्पर्धेत विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली असून एस आर के इंडो पब्लिक स्कूलच्या पूर्वी कुकडे हिने सुवर्ण पदक मिळवत चमकदार कामगिरी केली आहे. या स्पर्धेचे आयोजन पल्लवी धात्रक जिल्हा क्रीडा अधिकारी नागपूर पल्लवी धात्रक, माया दुबळे, तालुका क्रीडा अधिकारी सापटे, नरखेड तालुका संयोजक महादेव नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. स्पर्धेत नागपूर महानगर पालिका अंतर्गत येणाऱ्या 15 शाळा व ग्रामीण भागातील 20 शाळांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे उद्घाटन कैलास चौधरी, मेहबूब शेख, परेश देशमुख, सेन्साई किरण यादव, सेन्साई विनोद डाहारे, सेन्साई सुमित नागदवणे, सेन्साई दुर्वास कडू , सेन्साई तुषार डोईफोडे, सेन्साई आचल राऊत, सेन्साई नरेंद्र बिहार सर, सेन्साई घनश्याम कळंबे यांच्या हस्ते करण्यात आले. तर स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अनमोल भोयर, निपुल मस्के, शशांक विश्वकर्मा, मनीष निमजे, नवीन उनरकर, मोहित इंगळे, मंताशा शेख, यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी नरेंद्र बिहार यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे संचालन सेन्साई नरेंद्र बिहार यांनी केले तर आभार सेन्साई दुर्वास कडू यांनी केले. पूर्वी कुकडे व प्रशिक्षक अंकिता बाबुळकर हीचे शाळेच्या प्राचार्य शुभांगी अर्डक यांनी अभिनंदन केले.

फोटो ओळी. सुवर्ण पदक पटकावणारी पूर्वी कुकडे व प्रशिक्षक अंकिता बाबुळकर मान्यवरान सोबत.