मोर्शी विधानसभेसाठी बहुजन समाज पार्टी तर्फे प्रा. कमलनारायण उईके यांची उमेदवारी निश्चित

Mon 21-Oct-2024,04:12 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनीधी रवि वाहणे शेदुरंजनाघाट

 

 

अमरावती:मोर्शी नुकतेच १९ ऑक्टोबरला मोर्शी येथे झालेल्या बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये युवा व झुंजार नतृत्व बहुजनांचे नेते बिरसा क्रांती दलाचे अमरावती जिल्हाध्यक्ष प्रा. कमलनारायण उईके यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह बहुजन समाज पार्टीमध्ये प्रवेश घेतला. मोर्शी विधानसभेसाठी त्यांनी बहुजन समाज पार्टीकडे उमेदवारी मागितलेली आहे. वर्धा येथे बि.एस.पी प्रदेश प्रभारी अहीरवार साहेब, पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील डोंगरे व प्रदेश महासचिव मोहन राईकवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या विधानसभा उमेदवारांच्या मुलाखतीसाठी सुद्धा ते उपास्थित होते. त्यांच्या सोबत ॲड. योगेश नागले, बिरसा क्रांती दलाचे जिल्हा संघटक ॲड. पवन वाडीवे, वरुड तालुकाध्यक्ष मनोज उईके, बामसेफचे श्रीपत रंगारी सर, सामाजिक कार्यकर्ते मनोज लांडगे उपास्थित होते. त्यांची शिफारस अमरावती जिल्हा प्रभारी दीपक पाटील, हर्षद शेळके व साहेबरावजी शिरसाठ यांनी केली. बहुजन समाज पार्टी तर्फे मोर्शी विधानसभेसाठी कमलनारायण उईके यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे प्रा.कमलनारायण उईके हे संपूर्ण मोर्शी विधानसभेतील लोकांना परिचित आहेत. अर्थशास्त्रात एम.ए व सेट परीक्षा उत्तीर्ण असलेले उच्चशिक्षित उमेदवार असून फुले शाहू आंबेडकर बिरसा पेरियार यांच्या विचारांचे, पुरोगामी वैचारिक क्रांतीकारी लढ्याचे ते वैचारिक वारसदार मानले जातात. शोषित वंचित - पिढीत - दलित - आदिवासी - ओबीसी व अल्पसंख्यांक बहुजन समाजाच्या न्याय अधिकारांसाठी व त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध गेल्या चार वर्षांपासून ते बिरसा क्रांती दलाच्या माध्यमातून संघर्ष करीत आहेत. दलित आदिवासी बहुजन समाजात वैचारिक जागृती निर्माण करणे व एससी, एसटी, ओबीसी व अल्पसंख्याक समाजात भाईचारा निर्माण करण्याच्या ते सतत प्रयत्नात आहेत. वैचारिक लढाई असो की रस्त्यावरची लढाई असो आंदोलन, मोर्चे आणि सामाजिक प्रबोधन अशा सर्व आघाडीवर ते सतत कार्यशील आहेत. त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले आहे. दलित आदिवासी बहुजन समाजाला त्यांच्या उमेदवारीची उत्सुकता आहे. त्यांच्यामुळे विधानसभेची लढाई अजून चुरशीची होणार आहे. आदिवासी व दलितांची मतदार संख्या बघता ही निवडणूक निर्णायक सुद्धा ठरू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे