निर्णय सभेत ठरणार सतरंजी संघटनेचा उमेदवार काटोल येथे होणार निर्णय सभा
प्रतिनिधी साजिद पठान नागपुर
जलालखेडा (त.20) सध्या नरखेड काटोल विधान सभा क्षेत्रात सतरंजी संघटनेची मोठी चर्चा असून सर्वच पक्षाचे नेतेमंडळी या संघटनेत असून सतरंजी संघटनेने काटोल विधान सभा क्षेत्रात आपला उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला असून जलालखेडा येथे सतरंजी संघटनेने रविवारी परिवर्तन सभा घेत सतरंजी संघटनेचा उमेदवार निवडणुकीत उभा राहणार असल्याचे जाहीर केले. रविवारी झालेल्या परिवर्तन सभेत सतरंजी संघटनेच्या नेत्यांनी अनिल देशमुख यांच्यावर घणाघाती आरोप केले असून 25 वर्ष सत्ता असून सुद्धा अनिल देशमुख यांनी या भागाचा विकास केला नसल्याचा आरोप केला. या भागात उद्योग आणले नाही, शेतकऱ्यांच्या हिताचे कोणते काम अनिल देशमुख यांनी केले नाही, या भागातील युवकांसाठी रोजगार निर्माण केले नाही असे अनेक आरोप यावेळी अनिल देशमुख यांच्यावर यावेळी सतरंजी संघटनेच्या नेत्यांनी केले. याभागातील घराणेशाही समाप्त करून शेतकऱ्याच्या मुलाला निवडून आणण्याचे आव्हान यावेळी करण्यात आले.आम्हाला पक्ष नव्हे तर सतरंजी संघटना महत्वाची असल्याचे मत यावेळी सतरंजी संघटनेच्या नेत्यांनी व्यक्त केले.शेतकऱ्याच्या घरात चांगले दिवस आले पाहिजे, ज्यांना आपण निवडून देतो त्यांचा शेतकऱ्याची झळ नाही, शेतकऱ्याचे प्रश्न सभागृह कोणी मांडत नाही.30 वर्ष सत्ता देऊन सुध्दा या भागाचा विकास झाला नाही.संतरणी संघटनेच्या बहुतांश सदस्यांनी अनिलबाबूच्या सतरंज्या उचल्या. 30 वर्ष सत्ता राहून फक्त रस्ते व नाल्या बाधल्या. तसेच 17 वर्ष गायब राहून आता सुबोध मोहिते या भागात फिरत आहे राहुल देशमुख यांनी सुध्दा निवडणुकीत उभे राहण्याची इच्छा दर्शवली आहे.30 वर्ष राहून अनिल देशमुख यांनी या क्षेत्राचे वाटोळं केलं.खोटा अपप्रचार केला जातो की राजेंद्र हरणे याना वावर घेऊन दिलं म्हणून ते निवडणूक लढवणार नाही.10 वर्षात मी एक जरी रुपया घेतला किंवा काही विकत घेतल असेल तर एक तरी कागद दाखवा मी सर्व दान करेल.आशिष देशमुख 2014 मध्ये निवडून आले.राजेंद्र हरणे यांनी 3 करोड घेऊन आशिष देशमुख याना समर्थन दिल्याचा आरोप सुध्दा माझ्यावर करण्यात आल्याचे राजेंद्र हरणे यांनी सांगितले.अनिल देशमुख यांनी वडल्याच्या किंवा मुलाच्या डोक्यावर हात ठेऊन सांगावं की मी एक रुपया घेतला असेल. मी एकाच पक्षात 31 वर्षात रहलो अनिल देशमुख यांच्या विरोधात बाजार समिती लढवली म्हणून मला पक्षाने मला जिल्हा प्रमुख पदावरू काढलं.अनिल देशमुख यांच्या तक्रारीवरून मला घरी बसवल.सतरंजी संघटना कधी तुटणार नाही. गाड्या लाऊन लोक बोलावणे सोप असत पण स्वतःहून इतक्या मोठ्या संख्येने आपण आलात हे खूप मोठी बाब असल्याचे राजेंद्र हरणे यांनी सांगितले.स्वतःहून येणारे खरे कार्यकर्ते आहे.पेट्या वाटण्याचे काम अनिल देशमुख करत आहे तर साड्या वाटण्याचे काम यज्ञवल्यक जिचकार करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. घराणेशाही संपवण्यासाठी सतरणजीची स्थापना केली असल्याचे राजेंद्र हरणे यांनी सांगितले.
रविवारी झालेल्या परिवर्तन सभेला राजेंद्र हरणे,समीर उमप,नरेश अरसडे,संदीप सरोदे,गोपाल टेकाडे,सुभाष पाटील,डॉ संजय ढोकणे,प्रमोद पेठे,प्रवीण सावरकर,किशोर महल्ले,सुरेश बारापात्रे,अधीर चौधरी,सतीश रेवतकर, चंद्रशेखर मदनकर,लोकेश काळे,संजय बडोदे, जिजाबाई बनाईत तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थिती होते आपले विचार व्यक्त करताना राजेंद्र हरणे.