इंदुरा शाळेत कायदेविषयक शिबीर संपन्न
प्रतिनिधी अशोक इंगोले हिंगोली
हिंगोली:वसमत तालुक्यातील इंजनगाव पूर्व येथील सी.बी.एस.ई.शाळेत आज बालक दिन व कायदेविषयक शिबीर संपन्न झाले.वसमत तालुका विधि सेवा समीती व वकील संघयांच्या संयुक्त विद्यमाने सदरिल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी कार्यक्रमाच्या अध्यक्षा पी. पी. नातु (सह दिवानी न्यायाधिश ) बसमत ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून कोकरे विस्तार अधिकारी पंचायत,चव्हाण मॅडम (समुपदेशक)भोसले (ग्रामसेवक )पानखडे सर सचिव इदुरा स्कूल. हे उपस्थित होते नातु मॅडम यांनी विदयार्थ्यांना बाल हक्क,संरक्षण, गुड टच बैड टच, सायबर क्राईम मुलभूत अधिकार आणि कर्तव्य बालकांच्या हक्काचे संरक्षण आणि बालकदिन आशा विविध विषयावर मार्गदर्शन केले. शाळेने मुलांसाठी उपलब्ध केलेल्या सेवा,सुविधांचेही त्यांनी कौतुक केले.तसेच चव्हाण मॅडम यांनीही बालकांचे हक्क आणि जबाबदाऱ्या याविषयी सविस्तर माहिती दिली.सचिव पानवडे सर यांनी बालकांच्या विविध सेवा सुविधांची माहिती दिली तसेच बालकांच्या हक्काचे संरक्षण सुरक्षा आणि गुणवत्ता हिच शाळेची प्राथमिकता असल्याचेही त्यांनी सांगीतले उपप्राचार्य खाकरे सर यांनी आभार प्रदर्शन केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या सर्व शिक्षकांनी मेहनत घेतली.