कोंबिग ऑपरेशन राबवित असताना अवैध दारू विक्रेता ला अटक
अब्दुल कदीर बख्श
पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील गुन्हे प्रगटीकरन पथकाचे अंमलदार हे दिनांक 17/11/2024 रोजी पोस्टे परिसरात विधानसभा निवडणूक संबंधाने पोलीस ठाणे परिसरात मा. वरिष्ठांच्या आदेशाने कोंबिग ऑपरेशन राबवित असताना कोचर वार्ड हिंगणघाट येथे राहणारा आकाश घनश्याम sorte हा त्याचे राहते घरी देशी दारूचा माल अवैध रित्या बाळगून विक्री करत आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर माहीती मा.ठाणेदार मनोज गभने सा. यांना देवून त्यांचे आदेशाने पोस्टाँप सह रवाना होवून मिळालेल्या माहीती प्रमाणे प्रो.रेड कार्यवाही केली असता देशी दारूचे बॉक्स मधे 100 बॉटल्स कीं 10000/- रू. चा माल जप्त करण्यात आला आहे.जप्त करून त्याचे विरूध्द पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला..ही संपूर्ण कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक अनुराग जैन साहेब, मा.अप्पर पोलीस अधीक्षक डाँ. सागर कुमार कवडे साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडीत सा. यांचे निर्देशानुसार मा.मनोज गभने, पोलीस निरीक्षक सा. हिंगणघाट यांचे आदेशाने पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील सपोनि आळंदे डि.बी. पथकाचे पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे, पो.ना. राहुल साठे, पोना विवेक वाकडे,पो.शी मंगेश वाघमारे पोशी आशिष नेवारे,पो.शि. विजय काळे यांनी केली. सदर गुन्हयांचा पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहे.