फत्तापूर गावातील गिट्टी क्रेशर परिसरात काँग्रेस पक्षाच्या मटण पार्टीत विहरीत पडून एकाच मृत्यू

Sun 10-Nov-2024,10:52 PM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी = पवन ढोके वरोरा 

येणाऱ्या 20 नोव्हेंबर च्या विधानसभा निवडणुकीत मतदारांना लुभावण्यासाठी उमेदवारांकडून मटण चिकन पार्ट्याचे आयोजन वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील विविध उमेदवार करत असून अशाच एका उमेदवारांच्या प्रचारार्थ ठेवलेल्या मटण पार्टीत दोन कार्यकर्त्यांचा विहिरीत तोल जाऊन एकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना काल दिनांक 10/11/2024 च्या रात्री 9.00 च्या दरम्यान घडली असून सर्वत्र दुःख व्यक्त केल्या जात आहे, दरम्यान एकाची प्रकृती बरी असून त्यांनीच बुडालेल्या व्यक्तीचे नाव सांगितले परंतु त्याला अजूनही विहिरी बाहेर काढण्यासाठी निकारीचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती आहे. दरम्यान या दुर्दैवी घटनेची वाच्यत्ता बाहेर जाऊन राजकीय खेळ बिघडू नये याकरिता उपस्थित सर्वांचे मोबाईल स्विच ऑफ करण्याचे फर्मान पक्षाच्या वरिष्ठाने दिली असल्याचे बोलल्या जात आहे.

 

एका उमेदवारांच्या प्रचारार्थ फिरणाऱ्या कार्यकर्त्यांना रविरारच्या दिवशी मटण ची मेजवानी देण्यासाठी उमेदवार यांच्या कार्यकर्त्यांनी मटण पार्टीचे आयोजन वरोरा तालुक्यातील फत्तेपूर येथील एका गिट्टी क्रशर परिसरात ठेवले होते त्या पार्टीत दारूचा सुद्धा ओलावा ठेवला असल्याने बेवड्यांना जणू पर्वणी मिळाली होती, त्यामुळे गजानन काळे आणि अरुण महल्ले यांनी दारूचे भारी डोज घेऊन मटणाचा आस्वाद घेण्याच्या नादात दारू पिणाऱ्यांना जास्त दारू झाल्याने जवळच असलेल्या विहिरीत दोघांच्या आपसात चर्चेत अनावधाने तोल जाऊन दोघेही विहिरीत पडले त्यात अरुण महले याला सुखरूप बाहेर काढण्यात आले तर गजानन काळे याला विहिरी बाहेर काढण्यात अपयश आले आहे, दरम्यान रात्रीच्या अंधारात बॉडी बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहे.