स्कूल ऑफ स्कॉलर वरुड येथे दिवाळी सणाचे आयोजन
प्रतिनिधि रवी वाहणे अमरावती
कै राधिका भाई मेघे द्वारा संचालित स्कूल ऑफ स्कॉलर वरून येथील प्री प्रायमरी विभागातील म्हणजे एस. ओ. एस. वरूड च्या वतीने पालक आणि पाल्य म्हणजेच मॉम आणि मी यांच्याकरिता भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय संस्कृतीचा वसा छोट्या छोट्या मुलांपर्यंत पोहोचवावा या उदात्त हेतूने या कार्यक्रमाच्या आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता जज म्हणून लाभलेल्या सौ सुरेखा झोटिंग प्राध्यापिका आहेत या कार्यक्रमाचे संचालन शाळेतील सहाय्यक शिक्षिका सीमा देशमुख आणि तेजस्विनी चोरे यांनी केले
आपल्या संस्कृतीमध्ये कुठलाही प्रसंग असो सण असो त्यावेळेला रांगोळीचे अत्यंत महत्त्व असते आणि हेच रांगोळीचे स्पर्धा येथे घेण्यात आली होती शाळेतील पालक स्पर्धक आपापल्या रांगोळ्या साहित्य घेऊन मुलांचा जास्तीत जास्त सहभाग त्यामध्ये इवल्याशा मुलांच्या हाताने सुंदर रांगोळीची तिथे रेखाटन केले गेले. त्यामध्ये रंगबिरंगी रंग उधळले गेले आणि या सर्वांमध्ये सहभक्त जणू काही आजच दिवाळी आली आहे स्कूल ऑफ स्कॉलर्स मध्ये असा भास होत होता या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक सम्राज देशमुख आणि त्याची मम्मी सायली देशमुख यांनी पटकावला
द्वितीय क्रमांक हर्षाली नीचित आणि त्यांची मुलगी जिज्ञासा निचीत यांनी पटकाविला .द्वितीय क्रमांक चिन्मय तायवाडे आणि शोभाताई तायवाडे यांना मिळाला, तर प्रियांश मुंडे आणि सरिता मुंडे यांना तिसरा नंबरचे पारितोषिक विभागून देण्यात आले आहे अशा प्रकारे या कार्यक्रमांचा आनंद सर्वांनी लुटला. जीवनाचे सर्वच रंग इथे बघायला मिळाले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वर्षा यावलकर यांनी केले .त्यानंतर लगेचच प्रायमरीच्या सर्व मुलांची रांगोळी स्पर्धेला सुरुवात झाली. फर्स्ट ओन वर्ड्स मुलांच्या सर्व मुलांच्या रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते आणि त्यामध्ये सुद्धा मुलांनी विविध रांगोळ्या ठिपक्यांच्या रांगोळ्या ,मुक्तहस्त चित्र रेखाटले आणि सर्वांचे विलोभनीय असे दृश्य या दिवशी स्कूल ऑफ स्कॉलर्स मध्ये बघायला मिळाले.