वर्ध विधानसभा मधे ग्रामीण भागात फ़क्त भोयर, शेंडे, व कोटंबकार यांचीच हवा ; बाकि उमेदवार यांची बत्ती गुल !

Sun 10-Nov-2024,03:47 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधि : अरबाज पठान 

वर्धा : वर्धा सेलु मतदार संघ ऐके काळी कांग्रेस चा बालकिल्ला असलेला आता मात्र 10 वर्षा पासून भाजप चे आमदार येथून विजयी होत आलेले आहे.आणि सलग तीसऱ्याँदा त्यांना भाजप तर्फे उमेदवारी मिळाली आहे.

वर्धा विधानसभा मतदारसंघात 16 उमेदवार रिंगणात आहेत. वर्धा परिसरात महाविकास आघाडीचे मित्रपक्ष काँग्रेसचे उमेदवार शेखर प्रमोद शेंडे, महायुतीचे मित्रपक्ष भाजपचे उमेदवार डॉ.पंकज भोयर आणि अपक्ष उमेदवार रविंद्र कोटंबकार यांच्यात तिरंगी लढत होणार असल्याचे दिसत आहे. भाजपचे डॉ.पंकज भोयर व अपक्ष रविंद्र कोटंबकार हे दोघेही तेली कुणबी समाजाचे असल्याने मतांची विभागणी होणार असून, त्यामुळे पंकज भोयर यांची गैरसोय होणार असल्याचे दिसून येत आहे. डॉ.भोयर आणि कोटंबकार दोघेही कुणबी समाजाचे आहेत. महाविकास आघाडीचे शेखर शेंडे हे तेली समाजातील आहेत. तज्ज्ञांच्या मते वर्ध्यातील निवडणुकीत जातीय समीकरण महत्त्वाचे असते. लोकसभा निवडणुकीत तेली समाजातील रामदास तडस यांचा पराभव झाला.  

त्यामुळे यावेळी तेली समाज अधिक सक्रिय असल्याचे बोल जात आहे. वर्धा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे डॉ.पंकज भोयर हे दोन वेळा निवडून आले होते. विधानसभा मतदारसंघाचा दौरा केल्यानंतर भाजपचे डॉ.पंकज भोयर यांची यावेळी हॅट्ट्रिक हुकन्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 वर्धा मतदारसंघातून काँग्रेसचे शेखर शेंडे यांचा तीनवेळा कमी मतांनी पराभव झाला. यावेळी निवडणुकीत काँग्रेसचे शेखर शेंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

अपक्ष उम्मेदवार रविंद्र कोटंबकार यांचा वर्धा सेलु विधानसभे मधे चांगल्या प्रकारे प्रचार सुरु आहे व प्रत्येक विधानसभेच्या गांव गावी जाऊन भेट देत आहे. रविंद्र कोटंबकार यांनी वर्धा विधानसभा येथील हजारों युवकांना रोजगार मेळावा घेऊन युवकांना रोजगार दिलेले आहे. व कोटंबकार समाज सेवे मधे मागील 10 ते 15 वर्षा पासून नागरिकां सोबत जुडून राहलेले आहे. त्यांच्या कड़े समस्या घेऊन गेलेलेला प्रत्येक व्यक्ति हा आपली समस्या मांडतात आणि कोटंबकार समस्या मार्गी पण लावतात . ज्या कारनाने सम्पूर्ण विधानसभे मधे अपक्ष उम्मीदवार मनुन रविंद्र कोटंबकार यांची चांगलीच हवा बनलेली आहे.

 

काही अपक्ष उम्मीदवारांची फ़क्त सोषल मिडिया वर सिट्टी

 

काही अपक्ष उम्मीदवारांची फ़क्त सोषल मिडिया वर सिट्ट चा आवाज असून ग्रामीण भागा मधे सिट्टी चा आवाजच नाही.शोषल मिडिया वर हवा करुण आमदार बनु असे होत नाही व चुनाव पाहून 3 4 महिन्या अगोदर गांवो गावी जाऊन भेटि गठि दिल्याने होत नाही.तर त्या साथी 5 10 वर्षा पासूनच जनते मधे राहून नागरिकां प्रश्न मार्गी लावावे लागतात. चुनाव आले व आपन कामी लागलो असे होत नाही.

 

ज्या कारणनाने महायुती चे डॉ. पंकज भोयर महावीकास आघाडी चे शेखर शेंडे व अपक्ष रविंद्र कोटंबकार यांच्या मधेच तिरंगी लडत होईल असे दिसून येत आहे.