एस.ओ.एस.कब्स वरुड मध्ये"पालकांकरिता" मास्टर शेफ स्पर्धा उत्साहात संपन्न
प्रतिनीधी रवि वाहणे शेदुर्जणाघाट
वरुड:-कै.राधिकाबाई मेघे महिला शिक्षण संस्था द्वारा संचालित एस.ओ.एस.कब्स वरुड च्या वतीने नर्सरी ते के.जि.२ च्या पालकांकरिता " मास्टर शेफ"ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेकरिता वरुड नगरिचे भुषण असलेल्या सुप्रिया आशिष बंदे या परिक्षक म्हणून लाभल्या होत्या.सरस्वतीच्या पुजनाने स्पर्धेची सुरुवात झाली.शाळेचे मुख्याध्यापक सुनीत कुमार दुबे यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून या स्पर्धेचा मुख्य उद्देश आणि भूमिका विशद करून सांगितली.या स्पर्धेचे काही नियम म्हणजे कुठल्याही प्रकारच्या इंधनाचा वापर न करता पदार्थ तयार करणे म्हणजेच आरोग्यासाठी उपयुक्त आणि पोषक सकस आहार तयार करणे हा ही स्पर्धा घेण्यामागचा मुख्य उद्देश होता. या स्पर्धेमध्ये भरपूर प्रमाणात पालकांनी सहभाग घेतला होता.विशेष करुन महिलांनी सहभाग घेऊन या स्पर्धेची शोभा वाढवली या स्पर्धेकरिता २० मिनिटे वेळ दिला होता त्या २० मिनिटांमध्ये आपल्या पाककृतीचे सादरीकरण करायचे होते.तर एकंदरीत सर्वच स्पर्धकांनी आपले कौशल्य दाखवून अतिशय सुंदर -सुंदर डिशेस तयार करून प्रशिक्षकांना विचार करायला भाग पाडले तरी सुध्दा प्रशिक्षकांनी अतिशय काळजीपूर्वक परिक्षण करुन प्रिया पंकज मेंघानी यांनी प्रथम क्रमांक तर मनिषा प्रविण मानकर यांनी द्वितीय क्रमांक तसेच जिज्ञासा चेतन निचित यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला त्याचप्रमाणे निकिता सुमित खुटेटा आणि प्रियल मुकेश अटलोये यांना उत्तेजनार्थ पारितोषिक वितरण करण्यात आले.तसेच यश प्राप्त पालकांना पाहुण्यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक सुनीत कुमार दुबे शैक्षणिक समन्वयक रुपाली काळे प्रशासन अधिकारी सुशील उघडे तसेच प्रि-प्रायमरिच्या शैक्षणिक समन्वयक किर्ती बोंडे,वर्षा यावलकर, रश्मी फाटे, तेजल देशमुख, तेजस्विनी चोरे,सिमा देशमुख सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल उघडे तर आभार प्रदर्शन रसिका उपासे यांनी केले. अशा प्रकारे हा कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला