रेल्वे प्रवाशाचे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना अटक २ लाख ७१ हजार रुपये
शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
बल्लारपूर : गेल्या काही दिवसांपासून रेल्वे प्रवाशांचे मोबाईल चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, रेल्वे लोहमार्ग पोलीसांनी मोबाईल चोरांचा शोध घेत आरोपींकडून २ लाख ७१ हजार रुपये किमतीचे १० मोबाईल जप्त केले, असून २ आरोपींना अटक केले.रेल्वे पोलीस स्टेशन वर्धा येथे दाखल कलम ३०४(२) बीएनएस २०२४ मधील गुन्ह्याचे आरोपींचे शोध घेत असता गुप्त बातमीदाराकडून माहिती काढून आरोपी समीर शेख साबीर शेख (२५), आर्यन उर्फ साहिल वसीम शेख (२०) वर्ष दोन्ही राहणार चंद्रपूर यांना अटक करून त्यांच्याकडून दोन्ही गुन्ह्यातील २ मोबाईल एकूण किंमत ५५ हजार रुपये तसेच गुन्ह्याव्यतिरिक्त एकूण १० मोबाईल किंमत २ लाख १६ हजार असा एकूण २ लाख ७१ रुपयाहजार च्या मुद्देमाल जप्त करण्यात आले असून दोन्ही आरोपींना मा.वि. कोर्टात पेश करुन १ दिवसाचा पीसीआर घेण्यात आले.सदर आरोपी चंद्रपूर रेल्वे स्थानकाच्या हद्दीत चालत्या ट्रेन मधील प्रवाशांचे मोबाईल हिसकावून पळून जात होते.सदरची कारवाई वर्धा लोहमार्ग पोलीस स्टेशन चे ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक हर्षल चापले,डी बी पथकचे हवालदार संतोष वाडगिरे, अन्सार खान, पोलिस शिपाई पंकज भांगे, संदेश लोणारे,अजय मुन,चंदन डेहनकर चालक पोलिस शिपाई काशिनाथ केंद्र तसेच रेल्वे पोलिस चौकी बल्लारशाह चे अखीलेश चौधरी, निलेश निकोडे न केली.