स्थानिक गुन्हे शाखा अँक्शन मोड वर आणखी एका तंबाखू विक्रेत्याला अटक
शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
चंद्रपूर : स्थानिक गुन्हे शाखा ॲक्शन मोड वर असून काल दोन ठिकाणी धाड टाकीत तीन तंबाखू विक्रेत्याला अटक केले. स्थानिक गुन्हे शाखेचा एका पथकाने भद्रावती येथे दोन आरोपींना अटक करताच दुसऱ्या पथकांनी बाबुपेट चंद्रपूर येथे छापा टाकून एका आरोपीला अटक केले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपिनिय माहिती वरून आरोपी रोशन कामडी (२९) गन्नुरवार चौक, बाबुपेट चंद्रपूर याचा घरी सुगंधित तंबाखू चे साठा असल्याबाबत माहिती मिळाली त्यानुसार आरोपी रोशन कामडी यास ताब्यात घेऊन त्याचा घराची झडती घेतली असता २४ हजार १२५ रुपये किमतीचे प्रतिबंधक सुगंधित तंबाखू मिळून आल्याने माल जप्त करून आरोपीस ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे कलम २२३, २७५ बीएनएस सह कलम ३० (२), २६ (२) (अ), ३, ४, ५९ (१) अन्नसुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ प्रमाणे गुन्हा नोंद केले. सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक मधुकर सामलवार, पोलिस हवालदार दिपक डोंगरे, शिपाई संतोष येलपुलवार, गोपाल आतकउलवआर, गोपीनाथ नरोटे यांनी केले.