सावली तालुक्यात ट्रॅक्टरला दुचाकीची जबर धडक तिघांचा मृत्यू

Thu 28-Nov-2024,08:06 AM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

चंद्रपूर : सावली तालुक्यातील बोधली हिरापुर मार्गावरील वरील मार्कंडेय विद्यालयासर्मोर झालेल्या अपघात तीन जन ठार झाल्याची घटना बुधवारी रात्री ९-३० वाजताच्या सुमारास घडली.हर्षद संदिप दंडावार (१८)रा.बोरचांदली ता. मुल यांच्यासह साहिल नंदु गनेशकर (२०) रा.भंगाराम तळोधी ता. गोंडपीपरी.साहिल अशोक कोशमशीले (२१) रा.बोंथली ता. सावली असे मूतकाचे नाव आहे.शेतातुन काम करुन ट्रॅक्टर ही रोड च्या कडेला लावुन एका सोबतीची वाट बघत असतांनाच केटीएम कंपनीची एमएच ३४ सीएल ३२२९ या दुचाकीवर तिघे जण भरधाव वेगाने जात असतांनाच दुचाकी स्वतांचा संतुलन सुटला आणि त्याने उभी असलेल्या ट्रॅक्टर एमएच ३४ एपी १०४२ च्या मोठ्या चाकाला जबर धडक दिली.धडक इतकी भिषण होती.की हर्षद दंडावार याचा जागीच मृत्यू झाला.तर साहिल कोसमशिले बोंथली व दुचाकी वर असलेला भंगाराम तळोधी येथील त्याचा मित्र साहिल गणेशकर गंभीर जखमी झाला.त्या दोघांना गडचिरोलीच्या रुग्णालयात नेताना साहिल गणेशकर चा वाटेतच मृत्यू झाला.तर साहिल कोसनशिले या युवकाचा उपचारां अंति मूत्यु झाला.तिनही युवक हिरापुर येथे नाटक पाहण्यासाठी जात असल्याचे समजते.या अपघाताने सर्वत हळहळ व्यक्त केला आहे. अपघातातील तिन्ही तरुण युवक हे पंचवीस च्या वयाचे आहेत.