क्रिडा संकुलमध्ये मेळाव्याचे आयोजन,खेळाडुंच्या भवितव्यासोबत खेळ
प्रतिनिधी :- शारुखखान पठाण वरोरा
वरोरा :- वरोरा शहरातील क्रिडा संकुल येथे खेळाडुंना खेळांचा सराव करण्यासाठी भव्य मोठे तालुका किडा संकुल पोलीस स्टेशन रोड वर उभारण्यात आले. मात्र या क्रिडा संकुलनाचे मैदान आता मेळावे भरविण्यात होत असल्याने शेकडो खेळाडू यामुळे वंचित राहत असल्याने तरुण क्रिडा प्रशिक्षण , सराव करणारे यांना यामुळे अडचण निर्माण झाली आहे.क्रिडा संकुल येथे अनेक युवक या भव्य क्रीडांगणावर विद्यार्थी वेगवेगळया खेळांचा सराव करून आपापल्या खेळात निपुण होण्याचा प्रयत्न करत असतात. एखादा खेळाडु राज्य स्तरावर किंवा राष्ट्रीय स्तरावर पोचला तर त्याचे त्याला प्रमाणपत्र मिळतात. एखादा विद्यार्थी शालेय स्तरावर खेळला तर १० गुण प्राप्त होतात. किंवा खेळाडुंने खेळात प्राविण्य प्राप्त केले तर २० गुणाचा शिक्षणात समावेश केला जातो. सदर क्रीडा संकुलवर दरवर्षी मनोरंजनाच्या कार्यक्रमाला प्रशासन मंजुरी देवून विद्यार्थ्यांच्या भवितव्यासोबत खेळून त्यांच्या भविष्याचा खेळखंडोबा करत असल्याच्या भावना येथील खेळाडुंनी तक्रार निवेदनातून आपल्या पर्यंत मांडल्या आहेत. जेनेकरून आम्हाला लवकरात लवकर क्रीडा संकुल खाली करून पुर्ववत ग्राऊंड उपलब्ध करून द्यावे. याकरिता उप विभागीय अधिकारी डी. जेणीत चंद्रा यांना देण्यात आले आहे यावेळीऋतिक थेरे, मयूर पिंजुरकर,ओम गौत्रे, भूषण बेलेकर, निकुंज सोनटक्के, खोखो खेळाडू चेतन बावणे, अनिकेत तमटकर, राहुल दडमल, वैभव कोवे, संकेत बोथले, कोळसे, मनिष नंदनवार, रवींद्र देसाई उपस्थित होते.