आलु घेऊन जाणाऱ्या अनियंत्रित ट्रक पलटी ट्रक चालकाचा मृत्यु कंडक्टर जखमी
शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
बल्लारपूर : आग्राहून विजयवाड्याकडे आलू ने भरलेल्या ट्रकचे नियंत्रण सुटल्याने बल्लारपूर पेपर मिल काटा गेट जवळ उलटला. या घटनेत ट्रक चालकाचा मृत्यू झाला असून कंडक्टर किरकोळ जखमी झाला आहे. ही घटना आज २९ नोव्हेंबर ला ४.३० वाजता घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक क्र. ए पी १६ टीएच १४४४ हे बटाटे भरून आग्राहून विजयवाडाकडे जात होते. दुपारी साडेचार वाजता ट्रक पेपर मिल काटा गेटजवळ आला असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक डीवायडर तोडून दुसऱ्या बाजूला उलटला. या घटनेत ट्रकचालक नरसिंह गंभीर जखमी झाला होता. त्यांना उपचारासाठी बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे त्यांच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला.तर कंडक्टर सीताराम सोनी किरकोळ जखमी झाले आहेत.पोलीसांना माहिती मिळताच घटनास्थळ गाठुन क्रेनच्या सहाय्याने ट्रक सरळ करून मार्गावरील वाहनांची वाहतूक सुरळीत केली.पुढील तपास बल्लारपूर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक सुनील गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संतोष येनगंधेवार शिपाई गोकुळ कुसराम करीत आहे.