मोबाईल चोरणाऱ्या चोरट्यास अर्ध्या तासात अटक बल्लारशाह लोहमार्ग पोलिसांची कारवाई

Wed 04-Dec-2024,05:52 AM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर 

बल्लारपूर : बल्लारशाह रेल्वे स्थानकातील लोहमार्ग पोलिसांनी अर्ध्या तासातच एका लेडीज पर्स चोरणाऱ्या चोरास २९ हजार ९०० रुपये च्या मुद्देमाल सह अटक केले. ३ डिसेंबर ला सायंकाळी ७.४० वाजताच्या सुमारास रेल्वे स्टेशन बल्लारशाह येथील तिकीट काऊंटर येथून एका महिलेचे लेडीज पर्स चोरी गेली. त्या लेडीज पर्स मध्ये एक मोबाईल व नगद २१ हजार ९०० रुपये होते. असे एकूण २९ हजार ९०० रुपये चे मुद्देमाल चोरी गेले. महिलांनी बल्लारशाह लोहमार्ग पोलीस येथील चौकीत तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करीत सीसीटीवी तपासून अर्ध्या तासात आरोपी संतोष सुधाकर तिरमारे (३८) रा.रामाळा ते. सिंदेवाही जिल्हा चंद्रपूर यास अटक केले.यांच्या कडून एक विवो कंपनी चा मोबाईल किंमत ८ हजार रुपये व नगद २१ हजार ९०० रुपये मुद्देमाल जप्त केले. सदर कारवाई रेल्वे पोलिस स्टेशन वर्धा चे ठाणेदार सहायक पोलिस निरीक्षक हर्षल चापले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस काॅन्स्टेबल संदेश लोणारे, पंकज भांगे, अखिलेश चौधरी, निलेश निकोडे, नरेंद्र कारमेगे, लोहमार्ग पोलीस नागपूर चे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार सागर खंडारे यांनी केले.पुढील तपास पोलीस हवालदार धीरज घरडे करत आहे.