आसिफ खान करणार "डंके की चोट पर" अनोखे आंदोलन
प्रतिनिद अथर शेख वर्धा: ए.आय.एम.आय.एम चे वर्धा शहर अध्यक्ष तथा जिल्हा प्रभारी आसिफ खान यांनी वर्धा शहरातील प्रभाग क्र १८ मधील प्रलंबित असलेले रस्ते आणि नाल्यांच्या बांधकामाची मागणी मुख्याधिकारी नगर परिषद वर्धा यांना निवेदन देऊन केली होती, सदर निवेदनाची कोणतीच दखल नगर पालिका प्रशासनाने घेतली नसल्याचे निदर्शनास येत असल्या कारणाने आसिफ खान यांनी वारंवार नगर पालिका अधिकारी यांना संपर्क करून पाठ पुरावा केला. गेल्या तीन वर्षांपासून नगर पालिका येथे स्थायी समिती सदस्य निवडणुका न झाल्यामुळे, वर्धा नगर पालिका अधिकारी वर्गणी "हम बोले सो कायदा" अशी मुजोर भूमिका घेऊन नगर पालिकेचा कारभार चालवत असल्याची प्रत्यक्ष अनुभूती जनतेला येत आहे. काही माजी नगरसेवक व राजकीय नेत्यांचे नगर पालिका अधिकाऱ्यांन सोबत असलेल्या साट्या लोट्यानमुळे माझ्या प्रभागातील विकासाची कामे खोळंबली असल्याचा आरोप आसिफ खान यांनी केला असून या निगरगट्ट झालेल्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कार्यवाही करावी आणि प्रभाग क्र १८ मधील पाकिजा कॉलोनी, जाकिर हुसेन कॉलोनी या परिसरातील रस्ते आणि नाल्यांच्या बांधकामाचे आदेश येत्या १५ दिवसांच्या आत देऊन सदर बांधकाम तात्काळ पूर्णत्वास नेऊन प्रभागातील जनतेला न्याय द्यावा, असे जर नगर पालिका प्रशासनाला शक्य नसेल तर आम्हाला ''डंके की चोट पर" आंदोलन करून मागण्याची पूर्तता करून घेता येईल असा गर्भित इशारा आसिफ खान यांनी नगर पालिका अधिकारी यांना दिला. सदर आंदोलन हे तीव्र स्वरूपाचे करण्यात येईल आणि या आंदोलना दरम्यान काही अनुचित घटना घडल्यास याला सर्वस्वी जबाबदार नगर पालिका प्रशासन राहणारा अशी माहिती ए.आय.एम.आय.एम. च्या वतीने देण्यात आली.