योगायोग ग्रुप व निसर्गप्रेमी कला मंच द्वारा 26 नोव्हेंबर संविधान दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला
प्रतिनीधी रवि वाहणे शेंदुर्जनाघाट
अमरावती:अमरावती स्थानिक छत्री तलाव गार्डनमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे आयोजन संजय तागडे यांनी केले तर प्रमुख पाहुणे सिद्धार्थ बागडे, डॉक्टर सुधाकर वाहने, अध्यक्ष पुंडलिकराव सुखदेवे, प्रमुख वक्ते ऍड डॉक्टर आशिष हाडके अधीक्षक सामाजिक न्याय भवन विभाग अमरावती, हे होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविक झाले त्यानंतर संविधानाचे उद्देशिका सामायिक वाचण्यात आली. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. विचार मंचकावरील मान्यवरांचे भाषणे झाली . डॉक्टर आशिष हाडके यांनी सर्वसमावेशक संविधानावर आधारित, शासकीय नोकऱ्या उद्योग, शिक्षण, देश विदेशातील नोकरी कशी बळकवता येईल याविषयी आपले मार्गदर्शन भाषणातून व्यक्त केले, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिता संजय तायडे यांनी केले, आभार प्रदर्शन ढोले यांनी केले शेवटी राष्ट्रगीत म्हणून हा कार्यक्रम समाप्त करण्यात आला त्यानंतर अल्पोहार म्हणून केळी व सफरचंद देण्यात आले या कार्यक्रमात, भीम गीत, संविधान गीत सादर करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुकुंदराव चोतपगार, अरुण बोरकर, राजकुमार मेश्राम, गोवर्धन हरडे,, नारायण दहाट, पीएम चंडिकापुरे, हरपाल पहलानी, देवेन भाऊ, राजाभाऊ भूरभुरे, देवानंद वाकोडे, सुधीर धाकडे, सुनिता तागडे, रेखा भोगे, मंगला इंगोले, संगीता वानखडे, गीता खेडकर, कल्पना च्योत पगार, शितल इंगळे, मैत्री तागडे, प्रगती ढाणकेइत्यादींनी प्रयत्न केला