जुन्या योजनेचा फेर आराखडा करणाऱ्या अर्थसंकल्पाने तरुण,महिला आणि शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे -खासदार डॉ.नामदेव किरसान
तालुका प्रतिनिधी अजय दोनोडे आमगांव
गडचिरोली:चिमूरचे खासदार डॉ.नामदेवराव किरसान यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की.केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा जुन्या योजनेचे पुनरुच्चार करणारा होता.शेतकरी, महिला, तरुणांची निराशा झाली आहे.महागाई झपाट्याने वाढत असताना महागाई कमी करण्यासाठी कोणतीही तरतूद नाही, लोकांचे उत्पन्न कसे वाढेल याचा उल्लेख नसून उत्पन्नात कोणतीही वाढ न करता केवळ उत्पन्नात सूट दिली जाईल,असे दाखवून सर्वसामान्य नागरिकांची दिशाभूल करण्यात आली. सत्तेत येण्यापूर्वी राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र आता किमान आधारभूत किंमत (एमएसपी), विमा कंपन्यांमध्ये थेट विदेशी गुंतवणूक (एफडीआय) वाढविण्याचे कोणतेही धोरण नसल्याने एलआयसीसारख्या सरकारी कंपन्या कमकुवत होतील आणि खाजगीकरण वाढणार, विमा कंपन्यांचे प्रमाण आणि बेरोजगारी वाढणार आहे,सरकारने तरुणांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केले, पण त्यांना प्रशिक्षणानंतर कायमस्वरूपी रोजगार देण्यासाठी या अर्थसंकल्पात कोणतीही प्रभावी योजना नाही!