पोलीस स्टेशन सिंदी रेल्वे पोलीस पथका कडुन विदेशी दारू व दुचाकी वाहणासह 85,800 रू चा. माल जप्त

Wed 08-Jan-2025,03:03 AM IST -07:00
Beach Activities

अरबाज पठाण ( वर्धा )

 

पोलीस स्टेशन सिंदी रेल्वे येथील पथकाने आज दिनांक 8/1/2025 रोजी खास मुखबिर कडुन माहीती मिळाले की, सचिन बबनराव पोहाणे रा. विकास चौक सेलु हा त्याचे ताब्यातील ग्रे रंगाचे सुझुकी अॅसेस मोपेड गाडी क्र. एम.एच. 32/ए.एन/5235 नी नागपुर जिल्हयातुन विदेशी दारूचा माल घेवुन सावंगी आसोला गावाचे रस्त्याने ड्रायपोर्ट परिसरातुन कच्चा रस्त्याने येणार असुन तो सेलडोह मार्गे सेलु येथे जाणार आहे. अशी माहीती प्राप्त झाल्याने ड्रायपोर्ट परिसर परसोडी शिवारात नाकेबंदी करून प्रोव्हीशन रेड केला असता त्याचे ताब्यात 1) ग्रे रंगाचे सुझुकी अॅसेस मोपेड गाडी क्र. एम.एच. 32/ए. एन/5235 किंमत 75,000 रू 2) गाडीचे डिक्कीमध्ये व पायदानावर 180 एम.एल. च्या रॉयल स्टॅग (आर.एस) कंपनिच्या विदेशी दारूने भरून असलेल्या एकुण 24 शिश्या प्रति नग 350रू प्रमाणे 8400रू 3) 180 एम.एल. च्या ऑफीसर चॉईस (ओ.सी) कंपनिच्या विदेशी दारूने भरून असलेल्या एकुण 24 शिश्या प्रति नग 250रू प्रमाणे 6000 रू असा एकुण जुमला किंमत 85,800 रू चा माल मिळुन आल्याने पंचनामा कार्यवाही प्रमाणे संपुर्ण माल जप्त करून आरोपी विरूध्द अपराध क्रमांक 02/2025 कलम 65 अई, 77 अ, महाराष्ट्र दारूबंदी कायदा सहकलम 3 (1) 181, 130/177 मोटार वाहण कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक अनुराग जैन सा, मा. अप्पर पोलीस अधिक्षक सागर कवडे सा, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा, प्रमोद मकेश्वर सा. याचे विशेष मार्गदर्शन व सुचनेप्रमाणे सहा. पोलीस निरिक्षक संतोष दरेकर पो.स्टे सिंदी रेल्वे यांचे मार्गदर्शनात पोलीस हवालदार आनंद भस्मे, संजय भगत, पो.शि. कांचन चाफले, उमेश खामनकर, संदेश सयाम, नितीन नखाते, शिवाणी निकम सर्व नेमणुक पो.स्टे. सिंदी रेल्वे यांनी केलेली आहे