राज्य पक्षी हरियल ला जीवरक्षक फाउंडेशन ने दिले जीवदान

Fri 31-Jan-2025,10:20 PM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी निखिल ठाकरे हिंगणघाट

हिंगणघाट:नायलॉन मांजावर बंदी असताना देखील राज्यात अनेक ठिकाणी नायलॉन मांजा सर्रास विक्री सुरू आहे त्या मुळे अनेक पक्षी प्राणी त्या नायलॉन मांजाचे शिकारg होतांना दिसत आहे. नायलॉन मांजा मुळे संकटात सापडलेल्या हरीयल या राज्य मान्यताप्राप्त पक्षाची माहिती जीवरक्षक फाउंडेशन च्या रेस्क्यु टीम मिळाली.गेल्या अनेक वर्षा पासून जीवरक्षक फाउंडेशन मुक्या जीवांवर वन्य प्राण्यांच्या मदतीला धाऊन जाण्याचे काम करत आहे. शहरात कुठेही वन्यप्राणी आढळुन आल्यास सर्वांच्या तोंडावर जीवरक्षक फाउंडेशन चे नाव सर्वात आधी येते. रेस्क्यू टीम चे सदस्य चेतन गावंडे,भाविक कोपरकर यांनी हरीयल रेस्क्यू करून त्याला पशु वैद्यकीय अधिकारी याच्या सल्याने औषध उपचार केले व वन विभागाच्या कर्मचारी दीपक वैरागडे यांच्या समक्ष निसर्गाच्या सानिध्यात सोडले.शहरात कुठेही वन्यप्राणी जखमी अवस्थेत आढल्यास जीवरक्षक फाउंडेशन च्या मदत केंद्रास संपर्क करा 8806301295 असे आवाहन जिवरक्षक राकेश झाडें यांनी केले आहे.