बीआयटीत खाण अभियांत्रिकी विभागातर्फे चर्चासत्राचे आयोजन
प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर
बल्लारपूर :बल्लारपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बल्लारपूर येथे खाण अभियांत्रिकी विभागातर्फे चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते.चर्चासत्र ऑलमोस्ट डनः फ्रॉम फियर टू फ्रीडम, क्रिएटिंग अ सेफर वर्ल्ड फॉर द फ्युचर या विषयावर होती. चर्चासत्राच्या मुख्य भागात अक्षय बी. थुल खाण अभियांत्रिकी विभाग लिखित लघुपट सादर करण्यात आले. चर्चासत्रात मुख्य पाहुणे व वक्ते म्हणून चंद्रपूर येथील राजीव गांधी अभियांत्रिकी संशोधन व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या डॉ. देवश्री कोडगिरे उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे डॉ. रजनीकांत मिश्रा संचालक, बीआयटी, प्राचार्य श्रीकांत गोजे पॉलिटेक्निक बीआयटी, डॉ. झेड.जे. खान डीन रिसर्च, बीआयटी, डॉ. सी. सत्यनारायण डीन शैक्षणिक, बीआयटी, डॉ. अर्चना निमकर डीन एसडीसी आणि प्रा. ज्योती मोराई टी अँड पी विभाग आदी उपस्थित होते.चार सत्रात चर्चासत्र झाले त्यात एक भारतीय महिला दिन, हाय, मी, सामाजिक सक्षमीकरणः एक सामायिक जबाबदारी या विषयावर स्वागत सोनुले यांनी पीपीटीद्वारे सामाजिक सक्षमीकरणाला कसे चालना देऊ शकतो आणि त्यासाठी कोणती पावले उचलली पाहिजेत हे स्पष्ट केले. प्रेरणादायी बदलः स्पीकरचा दृष्टीकोन या विषयावर प्रा. डॉ. देवा कोडगिरे यांनी स्वातंत्र्याची भीती आणि आपण आपल्या भीतीवर मात करून स्वातंत्र्याकडे कसे जाऊ शकतो याबद्दल चर्चा केली. पॉलिटेक्निकचे प्राचार्य श्रीकांत गोजे यांनी मुलांकडून वचन घेतले की या चर्चासत्रात आपण जे काही शिकलो ते एक सुरक्षित जग घडवण्यासाठी ते अमलात आणतील आणि इतरांनाही लागू करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतील. शैलेंद्र बोम्मनवार विभाग प्रमुख खाण अभियांत्रिकी विभाग यांनी जीपीएस तंत्रज्ञानाबद्दल माहिती दिली आणि हा सेमिनार यशस्वीरित्या आयोजित केल्याबद्दल प्रा. अक्षय बी. थूल यांचे आभार मानले.परिसंवादाचे प्रास्ताविक डॉ. अर्चना निमकर डीन एसडीसी यांनी केले आणि सूत्रसंचालन मोहिनी चौधरी खाण अभियांत्रिकी, द्वितीय वर्ष यांनी केले.