मुख्यमंत्री युवा कार्य, प्रशिक्षणाथीना नियमित तत्त्वावर रोजगार द्या-नरखेड व काटोल प्रशिक्षणाथी

Tue 21-Jan-2025,01:48 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी योगेश नारनवरे जलालखेडा

काटोल:मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत विविध कार्यालयात युवा प्रशिक्षण घेत आहे या योजनेअंतर्गत युवकांना प्रशिक्षण सोबतच विद्या वेतन देऊन शासनाने युवकांचा बेरोजगारीचा प्रश्न हा मोठ्या प्रमाणात सोडवलेला आहे या योजना मार्फत शासनाच्या विविध कार्यप्रणाली शासनाच्या विभागात काम करून जवळून समजून घेण्याची संधी मिळाली पण प्रशिक्षण सहा महिन्याच्या कालावधीत असल्यामुळे प्रशिक्षण संपल्यानंतर नेमकं करायचं काय कोण नोकरी देणार आज रोजगार मिळून सुद्धा बेरोजगारी होण्याची वेळ येत आहे असे कित्येक प्रश्न आणि समस्या प्रशिक्षणाच्या मनात उधवलेले अशा विविध समस्या गृहीत धरून प्रशिक्षणातील शासन सेवेत नियमित करा सहा महिन्याचा अनुभव गृहीत धरला जात नाही म्हणून सेवेत नियमित करावे सहा महिन्याच्या मागणीचे निवेदन नरखेड -काटोल प्रशिक्षणाथांनी काटोल 48 विधानसभा क्षेत्राचे आमदार चरण सिंग ठाकूर यांना 107 प्रशिक्षणथानी स्वाक्षरीची प्रत जोडून आमदार यांच्या माध्यमातून शासनाला निवेदन देण्यात आली आमदार यांना निवेदन देताना सकारात्मक चर्चा करून विषय पत्रद्वारे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यापुढे मांडू असे आश्वासन आमदार यांनी दिले आशिष शिरोडीया टीना राऊत शिभम रोकडे पूजा पेठे चेतन ढोके चेतन रेवतकर संगीता पेठे पूजा लाडसे रोशन राऊत लोकेश मल्सकोले शितल कोल्हे प्रियंका धवड पुष्पा खडसे क्षेअस मोहाडे आणि मोठ्या संख्येत नरखेड काटोल प्रशिक्षणाथी उपस्थित होते