नागपूर विद्यापीठाच्या संशोधकाची निर्मिती, आता दुचाकीमध्येच ठेवता येणार दोघांचे हेल्मेट
शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
नागपूर :- दुचाकी स्वारांसाठी उपयुक्त ठरेल, असे फोल्डिंग हेल्मेट राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील संशोधकांनी तयार केले आहे.दोघांचीही हेल्मेट दुचाकीमध्ये ठेवता येणारे नाविन्यपूर्ण संशोधन भौतिकशास्त्र विभागातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ. संजय ढोबळे आणि एमएससीची विद्यार्थिनी आदिती देशमुख यांनी केले आहे. प्रसार माध्यमाशी बोलताना प्रोफेसर डॉ संजय ढोबळे यांनी या संशोधनाबद्दल विशेष माहिती दिली. दुचाकीवरील दोघांना हेल्मेट घालणे अनेक ठिकाणी अनिवार्य करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर दोघांचे हेल्मेट ठेवायचे कुठे, स्कूटर मध्ये जागा कुठे आहे आणि बाळगत बसायचे कुठवर? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ. संजय जानराव ढोबळे यांनी एमएससी भौतिकशास्त्र विषयाची विद्यार्थिनी आदिती देवेंद्र देशमुख यांच्या सोबत संशोधन करून वाहन उभे असल्यावर दोन्ही हेल्मेट कसे ठेवता येईल. याकरिता फोल्डिंग हेल्मेटची कल्पना प्रत्यक्षात आणली आहे. त्यावर कार्य करीत दोघांनीही फोल्डिंग हेल्मेटची डिझाईन बनवून त्यातील सर्व कार्यपद्धती व मजबुती नियमित हेल्मेटप्रमाणे राहील याची काळजी घेत नवीन तंत्रज्ञानाच्या विज्ञानातून तयार केले. या फोल्डेड हेल्मेट करिता आंतरराष्ट्रीय पेटेंट देखील मिळविले आहे. हेल्मेटची उपयुक्तता सगळ्यांना माहिती आहे. त्याकरिता दुचाकीवर एक हेल्मेट ठेवायची व्यवस्था देखील केलेली असते. मात्र, दोघांसाठी देखील हेल्मेट अनिवार्य केले तर जेव्हा वाहन उभे राहील त्यावेळी हेल्मेट कोठे ठेवायचे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. जेव्हा प्रश्न निर्माण होतात. तेव्हा त्यावर उपाय शोधणे हाच संशोधकांचा विषय होता. या हेल्मेटची मजबूती नियमित हेल्मेटप्रमाणे राहून त्याद्वारे अपघाताच्या वेळी डोक्याला इजा होणार नाही, या प्रकारे साहित्य वापरण्यात येणार आहे. फोल्डिंग हेल्मेट उघडल्यावर व्यवस्थित उघडून ते डोक्यात घालता येईल, याची देखील काळजी घेण्यात आली आहेत. हेल्मेटची उपयुक्तता सगळ्यांना माहिती आहे. त्याकरिता दुचाकीवर एक हेल्मेट ठेवायची व्यवस्था देखील केलेली असते. मात्र, दोघांसाठी देखील हेल्मेट अनिवार्य केले तर जेव्हा वाहन उभे राहील त्यावेळी हेल्मेट कोठे ठेवायचे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. जेव्हा प्रश्न निर्माण होतात. तेव्हा त्यावर उपाय शोधणे हाच संशोधकांचा विषय होता. आजच्या परिस्थितीत ज्या दुचाकी वाहन आहे त्यामध्ये एक हेल्मेट ठेवण्याची व्यवस्था आहे आता नवीन संशोधनाद्वारे तयार केलेले फोल्डिंग हेल्मेट ठेवण्याची व्यवस्था होईल. समाजाच्या हितासाठी केलेले संशोधन हे विद्यापीठासाठी गौरवाची बाब झाली आहे.