आई ही शिक्षण,मूल्य आणि शिस्त यांची पहिली शाळा:आ.किशोर जोरगेवार
प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर
चंद्रपूर : आई ही प्रत्येकाच्या जीवनात देवतुल्य असते. तिच्या काष्टांमुळे आणि त्यागामुळे आपण घडतो. आई ही आपल्या संस्कृतीत केवळ एक नातं नाही, तर एक जबाबदारी, एक प्रेमळ सावली आणि एक निस्वार्थ सेवेचा मूर्तिमंत आदर्श आहे. आज आई नसल्याच्या दुःखाची जाणीव मला आहे.मात्र ज्या आईने सेवाभाव शिकवला, तिच्या जयंतीनिमित्त समाजाला मदत करता येत असल्याचा आनंद आहे.आई आपल्या मुलांसाठी केवळ जीवनाचा आधारच नाही, तर शिक्षण, मूल्य आणि शिस्त यांची पहिली शाळा असते,असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.स्व.प्रभा जोरगेवार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री स्व. प्रभा जोरगेवार यांच्या जयंती कार्यक्रमाचे सरदार पटेल महाविद्यालयातील सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते याप्रसंगी अनेक सामाजिक संघटना, भजन मंडळ आणि गरजू नागरिकांना आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला डॉ. किर्तीवर्धन दिक्षित,राजेंद्र सूर्यवंशी,प्रकाश देवतळे, वर्षाताई दत्तात्रय,सविता कांबळे,वंदना तिखे,भाजप नेते दशरथसिंग ठाकुर,श्याम धोपटे,माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टुवार,डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार,सविता दंढारे,सायली येरणे,भाग्यश्री हांडे,अमोल शेंडे,हर्षद कानमपल्लीवार,सतनाम सिंग मिरधा,अबरार सय्यद,दुर्गा वैरागडे,विमल कातकर,अल्का मेश्राम,कौसर खान,रेणुका येरणे,वैशाली मेश्राम, हेमलता खोब्रागडे, अस्मिता दोनाडकर आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, मागील वर्षापासून स्व. प्रभा जोरगेवार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने हा जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. मागील वर्षीही गरजूंसाठी साहित्य वाटप करण्यात आले होते.यंदाही हा उपक्रम आपण राबवत आहोत.या ट्रस्टच्या माध्यमातून भविष्यात शेवटच्या व्यक्तीपर्यंत मदत पोहोचावी, असे आवाहन त्यांनी केले.आईने आपल्या आयुष्यात आपल्याला घडवले, तशीच आपणही इतरांच्या जीवनात काहीतरी सकारात्मक बदल घडवू शकतो.आजचा हा आपल्याला आईच्या प्रेमाची, त्यागाची आणि निःस्वार्थ सेवेची आठवण करून देणारा दिवस आहे.आईचे स्थान कोणत्याही नात्यापेक्षा श्रेष्ठ आहे.तिचा त्याग, तिचे प्रेम आणि तिचे बलिदान याला कशाचीही तुलना होऊ शकत नाही. तिच्या संस्कारातून जोरगेवार कुटुंब उभे राहिले आहे.प्रत्येक वाईट काळात आणि विपरित परिस्थितीत ती खंबीरपणे उभी राहिली.त्यामुळे आज आम्ही सक्षम झालो असून,तिच्या शिकवणीनुसार इतरांना शक्य ती मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत,असेही आ.जोरगेवार म्हणाले.या प्रसंगी कर्णयंत्र,व्हीलचेअर, काठी,वॉकर,मॅट यांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन धनंजय तावडे यांनी केले. या कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.