18 डिसेंबर ला नागपुर विधानसभे मधे धड़कनार कामगारांचा मोर्चा

Sat 07-Dec-2024,10:13 PM IST -07:00
Beach Activities

 

अरबाज पठाण ( वर्धा )

महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समिती बांधकाम कामगारांचा राज्यव्यापी भव्य मेळावा पुणे येथे दिनांक 7 डिसेंबर रोजी पार पडला यावेळी मेळाव्यात महाराष्ट्र राज्य कामगार संघटना संयुक्त कृति समितीच्या वतीने अनेक ठराव घेण्यात आले त्यापैकी एक महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पूर्ववत सर्व ऑनलाईन पोर्टल कामे सुरू करण्यात यावे .

ठराव क्रमांक 01 चे मनोगत व्यक्त करताना सदस्य निवारा बांधकाम कामगार संघटना परभणी जिल्हाध्यक्ष शेख उस्मान शेख इस्माईल यांनी ठराव मांडला. व या ठरावाचे अनुमोदन संकल्प बांधकाम मजूर संघटना वर्धा संस्थापक अध्यक्ष मनीष गौरखेडे यांनी केले. या मेळाव्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील जवळपास दीडशे संघटना चे पदाधिकारी उपस्थित होते, महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष श्री शंकर पुजारी यांची निवड करण्यात आली. सागर तायडे, मध्यान भोजन बंद करणारे धाराशिव जिल्ह्याचे कामगार नेते आनंद भालेराव, कृती समितीमध्ये निवड झाल्याबद्दल सर्वांनी अभिनंदन केले.

संकल्प बांधकाम मजदूर संघटने द्वारे 18 12 2024 रोजी नागपूर येथे विधानसभा मध्ये कामगारांच्या मोर्चा घेऊन जाण्याचे नियोजन करण्यात आले. तरी सर्व कामगारांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहून्याचे आदेश देण्यात आले.

बेकायदेशीर पद्धतीने नको असलेल्या योजना राबवून मंडळाच्या पैसा डायव्हर्ट करणारे इमारत बांधकाम कामगार मंडळाचे मुख्य सचिव, तसेच कामगारांना प्रत्येकी 5000 बोनस देण्याचे आश्वासन देणारे कामगार मंत्री यांचे निषेध करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त संख्येने कामगारांनी उपस्थित राहून आंदोलनामध्ये सहभागी व्हावे असे आव्हान बांधकाम मजूर संघटनेच्या सर्व पदाधिकारी द्वारे सर्व कामगारांना करण्यात आले आहे.