आरमोरी बचाओ समिती तर्फे शहरातील समस्यांबाबत आमदारांना दिले निवेदन

Wed 25-Dec-2024,03:20 AM IST -07:00
Beach Activities

जील्हा प्रतिनिधी विभा बोबाटे गडचिरोली

आरमोरी :- शहरात अनेक गंभीर समस्या फोफावत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना अनेक समस्यांना समोर जावे लागत आहे शहरासह जिल्ह्यात कुठल्या प्रकारचे मोठे उद्योग नसल्याने जिल्ह्यातील व आरमोरी तालुक्यातील युवकांना रोजगारासाठी नागपूर मुंबई पुणे सारख्या मोठ्या शहरांमध्ये जावे लागते ही समस्या ओळखून शहरातील बेरोजगार युवकांना उद्योग उभारण्यासाठी एम.आय.डी.सी.ची जागा उपलब्ध करून देण्यात यावी व शहरात सातत्याने विद्युत समस्या असल्याने १३२ केव्ही विद्युत उपकेंद्राची निर्मिती करण्यात यावी तसेच आरमोरी तालुका क्रीडा संकुल चे क्रीडांगण अपुरे असल्याने पोलीस भरती व अन्य खेळांच्या खेळाडूंना सरावासाठी जिथे जागा मिळेल तिथे अथवा रोडवर रनिंग करावे लागत आहे हे गंभीर बाब ओळखून शहरातील बर्डी परिसरातील पटाचे दान येथे ४०० मिटर रनिंग ट्रॅक,हॉकी चे अस्ट्रोस्टर्फ,कुस्ती,फुटबॉल,क्रिकेट,कबड्डी,खो-खो सहीत अनेक खेळांचा सराव करणाऱ्या खेळाडूंसाठी अत्याधुनिक सोयी सुविधांनी पूर्ण असलेले क्रीडांगण निर्मिती करण्यात यावी,शहरातील रस्त्यांवर दुभाजक व टी पॉइंट,भगसिंग चौकात,जुना बस स्टॅन्ड,सिग्नल्स तयार करण्यात याबाबत निवेदन देण्यात आले याप्रसंगी आरमोरी बचाव समितीचे पदाधिकारी लक्ष्मी मने,दिलीप हाडगे,देवानंद दुमाने,राहुल जुआरे,महेंद्र मने उपस्थित होते.