पंचशील बुध्द विहार खडकी येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली
प्रतिनिधी योगेश नारनवरे जलालखेडा
नरखेड:जि.प.अंगणवाडी व पंचशील बुद्ध विहार खडकी येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी सावित्रीबाई ज्योतिबा फुले या एक भारतीय समाज सुधारक शिक्षण तज्ञ आणि कवित्री होत्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून त्यांना ओळखले जाते सावित्रीबाई यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली 3 जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिवस संपूर्ण भारतात बालिका दिन व महिला मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो सावित्री बाई फुले यांचा वारसा फार मोठा आहे त्यांनी स्त्री शिक्षणासाठी केलेले कार्य आदरणीय मानली जाते सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आज स्त्रिया शिक्षण घेत आहे आणि आज कोणी शिक्षिका अध्यापक डॉक्टर कलेक्टर तर कोणी इंजिनियर पोलीस वकील आहे आज दिनांक 3 जानेवारी खडकी येथील अंगणवाडी आणि पंचशील बुद्ध विहार येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली अंगणवाडी मुख्याध्यापिका ललिता शेंडे सेविका पंच ज्योती नारनवरे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून मार्गदर्शन केले आणि रमाई महिला मंडळ खडकी येथील महिलांनी पंचशील बुद्ध विहार येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी केली यात बंडू शेंडे,संदीप मानेराव,अनिल गजबे,पंचायत समिती सदस्य सुभाष पाटील,उमाकांत पाटील,उमाकांत पाटील,मनोहर नारनवरे,गंगाधर नारनवरे,प्रदीप नारनवरे,गितेश पाटील,अविनाश नारनवरे,कुणाल नारनवरे,दीपांशू पाटील,प्रफुल नारनवरे,वंदना नारनवरे,सविता मानेराव,गंगाबाई शेंडे,प्रीती मानेराव,अनिता नारनवरे,दीक्षा पाटील,प्रणाली मानेराव,आरोही मानेराव,मनस्वी बागडे,सृष्टी बागडे,रुखुमा नारनवरे,प्राजक्ता चणकापूरे,पुष्पा गौरखेडे,कांता हनवते,सुभद्रा मानेराव,रत्नमाला डोके,सुजाता चणकापूरे ,ललिता पाटील,ललिता नारनवरे,वैशाली नारनवरे,कविता नारनवरे,सुंदर मानेराव,आशाबाई धोंगडे,रमा नारनवर,अशा नारनवरे,कुसुम चणकापुरे,ज्योती पाटील,मंदा नारनवरे,ममता पाटील,इंदुबाई पाटील व समस्त गावकरी