वर्धा पोलीसांची उत्कृष्ठ कामगीरी मोटर सायकल चोरीचे तिन गुन्हे उघड
अरबाज पठाण ( वर्धा )
वर्धा : दिनांक 15/11/2024 रोजी यातील फिर्यादी नामे पवन पंजाबराव ठाकरे वय 28 वर्ष रा. गणेशनगर वर्धा, यांनी पो स्टे वर्धा शहर येथे येउन तक्रार दिली कि, दिनांक 11/11/2024 रोजी दुपारी 03/00 वा चे सुमारास ते एफ डी बाबत विचारण्या करीता पोस्ट ऑफीस वर्धा येथे गेले, व त्यांची मोटर सायकल कमांक एम एच 32 यु 9674 ही पोस्ट ऑफीसचे गेट सामोर उभी केली, विचारपुस करूण दुपारी 04/00 वा चे सुमारास मोटर सायकल जवळ आले असता त्यांना त्यांची मोटर सायकल दिसुन आली नाही, आजुबाजुला शोध घेतला मिळुण आली नाही, त्यांची एक लाल काळया रंगाची हिरोहोंडा सिडी डिलक्स मोटर सायकल कमांक एम एच 32 यु 9674 किमत 20,000/- रू कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली, अशा रिपोर्ट वरूण अप क 1943/24 कलम 303(2) बिएनएस प्रमाणे गुन्हा नोंद केला, तसेच दिनाक 24/08/2024 रोजी फिर्यादी नामे निलेश दिगांबर पेंदाम वय 44 वर्ष रा प्रतापनगर, गजानन महाराज मंदीर जवळ वर्धा यांनी पो स्टे वर्धा शहर ला तकार दिली कि, दिनांक 20/08/2024 रोजी रात्री 22/00 वा चे सुमारास फिर्यादी हे त्यांचे मित्र नामे दिवान रा. संतोषी माता मंदीर जवळ शिवाजी चौक वर्धा येथे त्यांचे घरी हिरो कंपनीची डेस्टीनी मोपेड गाडी क एम एच 32 एयु 3314 ही घेउन गेले, व त्यांचे मित्र घरी नसल्याने गाडी घरासामोर उभी ठेउन पायदळ त्यांना पाहण्या करीता छत्रपती शिवाजी पुतळ्या कडे गेले व त्यांचा मित्र मिळुण न आल्याने परत त्यांचे मोपेड गाडी जवळ गेले असता त्यांना त्याची हिरो कंपनीची डेस्टीनी मोपेड गाडी क एम एच 32 एयु 3314 हि दिसुन आली नाही, त्यांची डेस्टीनी मोपेड गाडी कि 60,000/- रू व गाडीचे डिक्कीतील एक अप्पो कंपनीचा मोबाईल कि 15,000/- रू असा एकुण 75,000/- रू चा माल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी करूण नेला. अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरूण अशा रिपोर्ट वरूण अप क 11340/24 कलम 303(2) बिएनएस प्रमाणे गुन्हा नोंद केला, तसेच 01/02/2025 रोजी फिर्यादी नामे नारायण संतोषराव वरने वय 65 वर्ष ररा. वायगाव निपाणी त. देवळी जि. वर्धा यांनी पो स्टे ला येउन तकार दिली कि, दिनांक 31/01/2025 रोजी दुपारी 12/30 वा चे सुमारास त्यांची हिरो कंपनीची सिडी डिलक्स गाडी क एम एच 32 एस 7164 ही डॉ रायजादा मॅडम यांचे हॉस्पीटल जवळ उभी करूण कॅलेंडर देण्या करीता हॉस्पीटल मध्ये गेले व परत आले असता त्यांना त्यांची मोटर सायकल दिसुन आली नाही, ती कोणीतरी आत चोरट्याने चोरूण नेली आहे, अयाा फिर्यादीचे रिपोर्ट वरूण अप क 0172/2025 कलम 303(2) बिएनएस प्रमाणे गुन्हा नोंद केला,
पोलीस स्टेशन वर्धा शहर येथील गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख पोहवा शैलेश चाफलेकर तसेच विजय पंचटिके हे चोरी गेलेल्या मोटर सायकलचा समांतर शोध घेत असता त्यांना माहीती मिळाली कि, मयुर गजानन नाकाडे वय 23 वर्ष रा. कारला चौक, हनुमान गड, गिरीपेठ वर्धा हा सराईत गुन्हेगार असुन त्याने मोटर सायकलची चोरी केली आहे, व तो सध्या नागपुर येथे चोरी करण्याचे उददेशाने फिरत आहे, अशा माहीती वरूण त्यांचे टिमसह रवाना होउन मयुर नाकाडे यास खबरे प्रमाणे एमआयडिसी नागपुर येथुन ताब्यात घेउन पो स्टे ला आणुन त्यास हिरोहोंडा सिडी डिलक्स मोटर सायकल क्रमांक एम एच 32 यु 9674 बाबत विचारणा केली असता त्याने सदर मोटर सायकल ही त्याचे घरी लपवुन ठेवली असल्याचे सांगीतले वरूण त्याचे घरी जाउन सदर मोटी सायकल हस्तगत करण्यात आली. तसेच बुरड मोहल्ला वर्धा येथे राहणारा मनीष उर्फ बिल्ला मनोज मसराम याने हिरो कंपनीची डेस्टीनी मोपेड गाडी क एम एच 32 एयु 3314 व एक अप्पो मोबाईल असे चोरी केले असल्याचे गोपनीय माहीती मिळाल्याने त्यास ताब्यात घेउन पोलीसी हिसका दाखविला असता त्याने सदर मोटर सायकल चोरी केल्याची कबुली दिली, व त्याचे घरूण एक अप्पो कंपनीचा मोबाईन व डेस्टीनी मोपेड गाडी हस्तगत करण्यात आली. तसेच अप क 172/2025 मध्ये चोरी गेलेली हिरो कंपनीची सिडी डिलक्स गाडी क एम एच 32 एस 7164 ही सुदधा हस्तगत करण्यात आली असुन सदर दोन्ही आरोपी यांना अटक करूण त्यांचे कडुन तिन गुन्हे उघडकिस आणले.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक अनुराग जैन, अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. सागर कवडे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा प्रमोद मकेश्वर, पोलीस निरीक्षक वर्धा पराग पोटे, यांच्या मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस हवालदार शैलेश चाफलेकर, विजय पंचटिके, पवन लव्हाळे, पंकज भरणे, लोभेश गाढवे, पोलीस शिपाई नंदकिशोर धुर्वे, सागर काळे, शिवदास डोईफोडे, सर्व पोलीस स्टेशन वर्धा शहर यांनी केली.