महासती बेनाबाईच्या दर्शनासाठी ३ लक्ष भाविक हजेरी लावणार

Wed 05-Feb-2025,06:16 AM IST -07:00
Beach Activities

तालुका प्रतिनिधी अजय दोनोडे आमगांव

आमगाव : शेकडो वर्षों जुने भक्तांचे दैवत कुलस्वामिनी महासती बेनाबाई मातेचे कुर्जा देवस्थान भाविक भक्तांच्या श्रद्धेने आजही तटस्थ आहे.दि. ६, ७ फेब्रुवारी रोजी त्रैवार्षिक यात्रे चे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी होणाऱ्या पुर्वी लांजी व आमगांव क्षेत्रातुन त्रैवार्षिक यात्रेकरीता भाविक १५ दिवसांअगोदर बैल बंडीने यात्रेला प्रारंभ करीत असत. देशाच्या विकासात जस-जशी वाढ होत गेली तसतसे यात्रेचे दिवस कमी होत गेले, दळनवळणाच्या सोई उपलब्ध झाल्या व यात्रेकरूंचा त्रासही कमी झाला, यात्रेकरूंच्या संख्येत वाढ होत गेली. आज महासती बेनाबाई मातेच्या त्रैवर्शिक यात्रेमध्ये महाराष्ट्रच्या कानाकोपऱ्यातुन भाविक येत असतात.आपल्या अनेक वडिलधारी मंडळींनी कुठलाही विचार न करता प्रारंभ केलेली ही यात्रा आज मध्य भारतात सर्वत्र नावलौकीकास आलेली आहे.काळाच्या ओघामध्ये आपण अनेक थोरांना मुकलो आहो. पण त्यांच्याच कृपा आशिर्वादाने ही महान परंपरा जपण्याचा यशस्वी प्रयत्न आपण आजही करीत आहोत.महासती बेनाबाई मातेच्या कृपेने भाविकांचे कल्याण झाले आणि होतही आहे. केलेल्या नवसाची लाज ती राखते. तिच्या कृपेने आलेल्या संकटातुन मुक्ती, धंदयात भरभराट, कुटुंबात सुख,शांती, समृद्धी व समाजात अनेकांचा मान बाढला, महिलासुध्दा देवीची ओटी भरण्याकरिता भक्तीभावाने मंदीरात मोठ्या संख्येने येत असतात.अनेक जाती-धर्माच्या लोकांच्या उपस्थितीने व सहकार्याने या यात्रेला भव्य दिव्य असे स्वरूप प्राप्त झालेले आहे.महासती बेनाबाई मातेचे शांत आणि प्रशांत दर्शन भाविकांना मोहून टाकणार दृष्य असते. या जागृत देवस्थान जिर्णोद्धाराच्या कार्याला आपल्या परिश्रमाने व यथाशक्तीने देवस्थानचे कार्यकारी मंडळ सुधारणा करित आहे. तसेच भाविकांच्या सहकार्याने व देवस्थानच्या वतीने त्रैवार्षिक यात्रा उत्सव फार आनंदमय पालखी सोहळ्यात साजरा केला जातो.तरी सर्व भाविक भक्तांचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रुपाने मंदीराला सहकार्य प्राप्त झाले आहे, तसेच महासती बेनाबाई माता त्रैवार्षिक यात्रेच्या त्रैवार्षिक यात्रा उत्सवात जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान मोरेश्वर फुंडे, राजकुमार फुंडे,बंडू हुकरे,बहुजी हुकरे, रमेशराव हुकरे,पत्रकार राजीव फुंडे,सुनिल फुंडे, विनोद हुकरे,बोगराज हुकरे, गणेश हुकरे रुपेश हुकरे, संतोष फुंडे, गनेश हुकरे, प्रतिभा हुकरे,शरद फुंडे यांनी केले आहे.