मकरसंक्रांती निमित्त दरवर्षी युवारंग तर्फे केली जाते वैनगंगा नदीची स्वच्छता.

Mon 13-Jan-2025,12:08 AM IST -07:00
Beach Activities

जिल्हा प्रतिनिधी विभा बोबाटे गडचिरोली 

आरमोरी :- नेहमी सामाजिक सांस्कृतिक क्रीडा आरोग्य क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारे युवारंग तर्फे मागील ८ वर्षापासून मकरसंक्रांति निमित्त वैनगंगा नदीवर स्वच्छता व "वैनगंगा हमारी माता है,स्वच्छ रखणा आता है " अश्या घोषणा देऊन जनजागृती करून कचरापेटी लावून वैनगंगा नदीची स्वच्छता केली जाते तर नदीपात्रात पवित्र स्नानासाठी येणाऱ्या महिला भाविकांना आंघोळ केल्यानंतर कपडे बदलविण्याची व्यवस्था नाही ही बाब लक्षात घेऊन महीला भगिनिंसाठी कपडे बदलविण्यासाठी तंबू भरले जाते हे सेवाकार्य युवारंग परिवार तर्फे निस्वार्थ पणाने केले जाते वैनगंगा नदीचे पात्र स्वच्छ ठेवण्यासाठी वेळोवेळी स्वच्छता अभियान राबविण्यात येतात या अभियानात जास्तीत जास्त युवक युवतींनी सहभाग घेऊन वैनगंगा नदी स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन युवारंग चे संस्थापक तथा अध्यक्ष राहूल जुआरे यानी केले आहे.