ग्रामीण रुग्णालय सालेकसा यथे क्षयरोग मुक्त भारत अभियानाचा शुभारंभ
तालुका प्रतिनिधी अजय दोनोडे आमगांव
सालेकसा तालूकातील सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत शंभर दिवसीय क्षयमुक्त भारत अभियानाच्या शुभारंभ येथील ग्रामीण रुग्णालयात 11 डिसेंबर रोजी करण्यात आला तालुक्यात ७ डिसेंबर ते 24 मार्च 25 पर्यंत तालुक्यात 7 डिसेंबर ते 24 मार्च 2025 पर्यंत 100 दिवसीय टीबीमुक्त अभियान राबविण्यात येणार आहे
अभियानाचे उद्घाटन ग्रामीण रुग्णालय सालेकसा वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर बी.डी जयस्वाल व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्वप्निल आत्राम सर यांचे हस्ते करण्यात आले यावेळी डॉक्टर आत्राम यांनी अभियान बद्दल सविस्तर माहिती दिली यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर राज श्रीपाठी,डॉक्टर मडावी,डॉक्टर प्रवीण सुखदेव,डॉक्टर वैरागडे मॅडम,डॉक्टर अंजली पांडे तसेच शंकरलाल अग्रवाल कॉलेजचे बिरणवार सर,खोब्रागडे सर व कॉलेज विघाथी रुग्ण उपस्थित होते मोहिमेत शिबिराद्वारे समाजातील अति जोखमीच्या लोकसंख्येची तपासणी करण्यात येणार आहे दोन आठवड्यापेक्षा जास्त दिवसाच्या खोकला वजन कमी होणे छातीत दुखणे संध्याकाळी येणारा ताप थुंकी वाटे रक्त पडणे पूर्वी क्षयरोग बाधित रुग्णांच्या सहवासातील रुग्ण एचआयव्ही बाधित रुग्ण कुपोषित व्यक्ती साठ वर्षावरील व्यक्ती मधुमेह बाधित रुग्ण 60 वर्षावरील व्यक्ती मधुमेह बाधित रुग्ण धूम्रपान करणार यांची क्षयरोग तपासणी करण्यात येणार आहे तपासणीत निदान झालेल्या क्षय रुग्णांना मोफत औषधोपचार देण्यात येणार आहे केंद्र सरकारच्या महत्त्वाकांची धोरणानुसार 2025 पर्यंत टीबी मुक्त भारत कार्यक्रमांतर्गत टीबीवर मात करण्यासाठी सौ दिवसीय अभियानाचआ माध्यमातून समाजातून टीबी हद्दपार करण्याचे उद्दिष्ट असल्याचे उपस्थित अधिकाऱ्यांनी सांगितले प्रस्ताविक तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्वप्निल आत्राम यांनी तर सूत्रसंचालन क्षयरोग पर्यवेक्षक आर जी लिल्हारे जी व आर् एफ फरदे यांनी केली यावेळी तालुक्यातील आरोग्य विभागाचे कर्मचारी असा सेविका असा गटप्रवर्तक व नागरिक उपस्थित होते तसेच शंकरलाल अग्रवाल विज्ञान महाविद्यालयातील येथील विद्यार्थी यांनी सहकार्य केले