कार्यकर्त्यांचा सन्मानाने पक्षाला बळ मिळते : सीतारामजी भुते यांचे प्रतिपादन, गिरड येथे कार्यकर्ता संवाद व सन्मान कार्यक्रम

Sat 07-Dec-2024,09:16 PM IST -07:00
Beach Activities

विलास लाभाने ( समुद्रपूर )

 

कार्यकर्त्यांच्या सन्मानातून पक्ष मोठा होतो तर राजकीय पक्षाला बळ मिळते यातूनच कार्यकर्त्यांत समाजशिलता आणि सामाजिक भाव निर्माण होत असते यासाठी कर्तव्यनिष्ठ आणि एकनिष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान केलाच पाहिजे असे प्रतिपादन शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते सीतारामजी भुते यांनी केले.

ते गिरड येथे कार्यकर्ता भेट व सन्मान सन्मान कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमात उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षातर्गत विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उत्कर्षांसाठी उत्कृठ कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कट्टर कार्यकर्ते सीतारामजी भुते होते तर सुनील आस्टिकर, विलास ढोबळे, एकनाथ डेकाटे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी युवा सेनेचे माजी तालुका प्रमुख राकेश चंदनखेडे यांच्या जन्मदिनानिमित्य कार्यकर्त्यांनी सदिच्छा भेट देत पक्षातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांचा सन्मान केला. यावेळी पक्षाचे एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्यांना पुष्प गुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी सीताराम भुते यांनी पोरकी झालेल्या शिवसेनेत माजी राज्यमंत्री अशोक शिंदे पुन्हा परतल्याने त्यांच्या अनुभवाचा आणि नेतृत्वाचा निश्चित पक्ष बांधणीत मोठा वाटा राहील. येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणुकीसाठी एकजुटीने आणि एकनिष्ठतेने कार्यकर्त्यांनी कार्य करावे असे आवाहन केले.

यावेळी दामू वाघ, गोपी थुटे, गणेश पुणेकर, पुंडलिक सहारे, राजेराम भिसेकर, गोलू भटें, राजू डेकाटे,अब्दुल कदीर, रियाज पटेल, विठ्ठल पिंजरकर,रामू कवासे,निखिल गिरडे, शुभम गुरफोडे, राकेश रोकडे, राजू पुणेकर, सुधाकर मोटघरे, प्रज्वल गौरकर, सुनिल नंदूरकर,प्रभाकर चामचोर,दिलीप तुपे,राहुल गिरडे, रामभाऊ ढोके,आकाश उरकूड़े, समीर चामचोर,विनोद डंभारे,विशाल डंभारे, आकाश डडमल,शोयल दानव,बालू झाडे यांची उपस्थिती होती.