सेवनिवृत्त शिक्षक सत्कार सोहळा संपन्न

Thu 16-Jan-2025,09:31 PM IST -07:00
Beach Activities

आखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचा एक नाविन्यपूर्ण उपक्रम - अण्णाजी आडे

 

हिंगणघाट (निखिल ठाकरे )

 

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ वर्धा द्वारा आयोजित जानेवारी ते डिसेंबर 2024 मध्ये सेवानिवृत्त झालेल्या अखिलच्या शिलेदारांच्या सेवानिवृत्त शिक्षक सत्कार सोहळा दिनांक 12 जानेवारी 2025 ला सकाळी 11 वाजता मातोश्री आशाताई कुणावार कला वाणिज्य महिला महाविद्यालय हिंगणघाट येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाला कार्यक्रमाला अध्यक्ष,सौ.मायाताई चाफले राज्य संयुक्त सरचिटणीस आखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ तर प्रमुख अतिथी म्हणून .अण्णाजी आडे राज्य कार्याध्यक्ष,सौ.उर्मीलाताई बोंडे,राज्य महिला आघाडी प्रमुख.सविताताई पिसे,राज्य संघटक, पुरुषोत्तम गंधारे माजी कार्याध्यक्ष,.अजय बोंडे,.राजेंद्र ईखार अखिल वर्धा जिल्हाध्यक्ष हे लाभले होते.

      वयाच्या अठावन्न वर्षापर्यंत आपली शिक्षकी पेशातली अविरत सेवा पूर्ण केलेल्या माझ्या सेवानिवृत्त शिक्षक बांधवांचा हा सेवानिवृत्त शिक्षक सत्कार सोहळा अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ वर्धा टिमचा वतीने आयोजित केला हा अतिशय उत्कृष्ट असा उपक्रम असून,पुढेही हा असाच सतत कायम चालू ठेवा असे मत पुरुषोत्तम गंधारे माजी कार्याध्यक्ष अ.म.प्रा शि.संघ यांनी आपल्या अतिथीय भाषणामध्ये व्यक्त केले.

    या सेवानिवृत्ती सत्कार सोहळ्यात सुरेश जोगे,.गजानन राऊत, विजया महाकळकर,.यशवंत चांभारे, कवडू शेळकी,दिलीप खंडाळे,यशवंत आटे,.गजानन अवचट,.गणेश तडस,.श्रीकांत नेरकर,.सिमा भुरे,.शंकर फरकाडे,.अशोक महाजन,.नामदेव रहाटे,.विवेक नाखले,ज्योती नाखले,.नरेंद्र तपासे,.नरेंद्र फुलमाळी,.माधुरी बोबडे,.गोपाल दांडेकर,.महादेव देशमुख यांचा सत्कार करण्यात आला.त्याचबरोबर MCERT द्वारा आयोजित शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत विशेष यश प्राप्त व विद्यार्थ्यांसाठी नवोदय बुस्टर मार्गदर्शन केल्याबद्दल शगजानन सोनवणे,मंगेश डफ, मयुरी देशमुख(पादाडे), .शुभांगिनी वासनिक,तर क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल शरद ढगे यांचा व सोबतच UGC द्वारा प्राध्यापक पदाकरीता असलेली NET परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल डॉ ज्ञानेश्वर वाघमारे यांचा व SET परीक्षा शिक्षणशास्त्र विषयात उत्तीर्ण केल्याबद्दल रमेश कामडी, स्वप्निल वैरागडे, प्रविना सोमकुवर या सर्वांचा सपत्नीक असा विशेष सत्कार करण्यात आला.

सर्वात जुनी शिक्षक संघटना म्हणून अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचा नावलौकिक आहे.ही संघटना अगदी गावपातळी पासून तर थेट विदेशापर्यंत कार्य करते आहे.अशा संघटनेत आपण काम करतो याचा सर्वांना सार्थ अभिमान असायला हवा अशी आशा याप्रसंगी राज्य कार्याध्यक्ष अण्णाजी आडे यांनी व्यक्त केली. सोबतच राज्य महिला आघाडी प्रमुख उर्मिलाताई बोंडे यांनी स्त्रिया या चूल आणि मुल पर्यंत सिमित न राहता त्यांनी संघटनेच्या कार्यात हिरीरीने सहभागी होऊन संघटना बळकट करण्याचे आवाहन केले. 

सदर कार्यक्रमाला जिल्हा नेते प्रदीप ताटेवार,तालुका अध्यक्ष गजानन भुते,सचिव राजाभाऊ मन्ने, तालुकाध्यक्ष श्रीधर घोडमारे,सचिव रमेश भिलकर, जिल्हा सचिव माधुरी विहीरकर सोबतच माधव काकडे,अरविंद मुंगल,सचिन येवले,मनोज मुंगले,छत्रपती रोकडे,मुकुंद गुजरकर,बाबाराव मस्कर,चव्हाण,विजय लीचडे,संजय पादाडे,मनोज बोधाने,गजानन आस्कर,नितिन खोडे,प्रशांत गिरडकर,रविंद्र सुपारे,मनोजकुमार राखुंडे,सुरेश गुंडे,प्रविण बिडकर,प्रफुल घोडे,धनराज घोडे,धनंजय बोटरे,विजय चांभारे,वासुदेव तडस,कमलाकर ठाकरे,राजश्री विरुळकर,संगिता ताटेवार,नंदा परिसे,वैशाली आस्कर,शारदा डुंबरे,स्वाती जांभुळे,वैशाली लांजेवार,अनिता गुंडे,रंजना गभणे,कमल सिडाम,प्रियंका कुटे,जया रागीट,तृप्ती कळवतकर वंदना आटे,सुरेखा सावंत,प्रतिभा नामुळते,वासंती राऊत,सुनिता कोल्हे,प्रियंका ढगे,उज्जना धात्रक,ऍड.अस्मिता मुंगल,छाया चांभारे व शेकडो अखिलचे कार्यकर्ते उपस्थित होते.