जीवनात यशस्वी होण्यासाठी ध्येयवेडे व्हा - मनोज गभने, ठाणेदार हिंगणघाट

Sat 04-Jan-2025,12:15 AM IST -07:00
Beach Activities

निखिल ठाकरे ( हिंगणघाट )

 

दिनांक ३ जानेवारी ला तुळसकर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट येथे सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त मातोश्री आशाताई कुणावार कला वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालय हिंगणघाट येथील करीअर मार्गदर्शन समिती अंतर्गत करीअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

प्रसंगी अध्यक्ष म्हणून डॉ उमेश तुळसकर अध्यक्ष, विद्या विकास शिक्षण संस्था हिंगणघाट तर मुख्य मार्गदर्शक म्हणून मनोज गभने( एमपीएससी उत्तीर्ण २००४ बॅच,ठाणेदार हिंगणघाट), प्रमुख पाहुणे नागेश 

उगले (पोलिस निरीक्षक हिंगणघाट),

संदेश मून (बी. इ.२००४ एमबिए, नेट(जेआरफ) २०१०, हे प्रामुख्याने उपस्थित होते.

नियोजित कार्यक्रमाअंतर्गत कला, वाणिज्य, व्यवस्थापन, फार्मसी इ. क्षेत्रातील विद्यार्थ्यांना 'स्पर्धा परीक्षा तयारी ' सोबतच वाढत्या सायबर क्राईम या संवेदनशील विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.शहरात वाचनकक्ष संचालित करणारे नागरिक विशाल घाटूर्ले , राजश्री अजय नंदनवार, तसेच जय जवान अकाडेमी चे संस्थापक सतीश तीमांडे यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

शहरात ४ ते ५ वाचनालयात जाऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी भरपूर आहेत,मात्र परीक्षेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्याचे प्रमाण फार कमी आहे, शिक्षणं समुपदेशक संदेश मून ह्यांनी या क्षेत्रात विद्यार्थ्यांची यशस्विता व कार्यक्षमता वाढावी ह्यासाठी प्राचार्य उमेश तुळसकर यांच्या संमतीने ठाणेदार मनोज गभने यांच्या उत्स्पूर्थ समावेशाने हा अनोखा पण माहितीपूर्ण कार्यक्रम घडउन आणला.

कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी संपूर्ण उत्साहाने सहभाग नोंदवला. प्रमुख वक्ते मनोज गभने यांनी दालनात अप्रतिम व्याख्यान देत गुरू आणि शिष्य यांची मने जणू जिंकून घेतली. नागेश उगले यांनी आपला कॉन्स्टेबल पासून ते पोलिस निरीक्षक बनन्याचा प्रवास शब्दांकित केला. सोबतच व्यसन आयुष्याचे कसे धिंडवडे काढते ते उदाहरणासह स्पष्ट केले.विद्यार्थिनी, चार्टर्ड अकाऊटंट लक्ष्मी इंगोले यांनी स्वतः ग्रामीण भागातून असूनही एक सर्वात कठीण पदवी करण्याचा आपला यश प्रवास वर्णिला. समुपदेशक संदेश मून यांनी नेट(जेआरफ) ह्या परीक्षेत पहिल्या प्रयत्नात सहज यश मिळवण्याचा इतिहास सांगितला. तसेच सर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी हिंगणघाट येथे पुणे किवा दिल्ली प्रमाणे वातावरण निर्मिती व्हावी ह्यासाठी नियमित समुपदेशन व्हायला पाहिजे असा आग्रह धरला. डॉ उमेश तुळसकर यांनी अध्यक्षीय मनोगतातून गरजू विद्यार्थ्यांना नियमित समुपदेशन साठी समूह आयोजन करण्याचा मानस घेत ;त्यासाठी ऑफिस आणि मदत देण्याची भूमिका घेतली. 

स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी एक सृजनात्मक आणि आगळावेगळा उपक्रम हिंगणघाट येथे संपन्न झाला. सूत्रसंचालन प्रा अभय दांडेकर यांनी तर प्रास्ताविक प्रा जमीर पटेल यांनी केले व 

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रमोद जयूपुरकर ह्यांनी आपल्या काव्यात्मक शैलित केले.कार्यक्रमाला महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक तसेच कर्मचारी उपस्थित होते. एकंदरित कार्यक्रम विद्यार्थ्यासाठी प्रेरणादायी ठरला