वर्धा जिल्ह्याला अखेर लागली लॉटरी; आमदार पंकज भोयर यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
![Beach Activities](https://htnewsindia.com/UploadImages/PostImage/नॅशनल_राजकीय_15122024184445.jpeg)
अरबाज पठाण ( वर्धा )
भारतीय जनता पक्षाचे आमदार निवडून आल्यानंतर पहिल्यांदाच जिल्ह्यात आमदार डॉक्टर पंकज भोयर यांच्या गळ्यात मंत्रीपदासाठी माळ पडली आहे.आज सायंकाळी आमदार पंकज भोयर यांनी नागपुर ला राज्यमंत्री पदा ची शपथ घेतलीं आहे .
आज सकाळी ही वार्ता जिल्ह्यात पसरली की आमदार पंकज भोयर हे मंत्री पदाची शपथ घेणार.हे माहित पड़ताच कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. एकमेकांना फोन जावु लागले. माझी पास तयार करा मी कार्यक्रमाला येतो. राजभवनात फक्त सातशे लोकांना बसण्याची व्यवस्था आहे. त्यामुळे आपला आज नंबर लागेल की नाही याची कार्यकर्त्यांना चिंता लागून होती. आपल्या नेता शपथ घेताना मी प्रत्यक्ष तिथे हजर असलो पाहिजे, यासाठी त्यांची धावपळ सुरू होती.
कार्यकर्ते सकाळपासून धावपळीमध्ये लागले होते. नागपूरला एकदा केव्हा जातो आणि नेत्यांना शुभेच्छा देतो असे झाले होते. आज सायंकाळला 5 वाजता पासून नागपूर येथील राजभवनात हिरवळीवर मंत्र्यांचा शपथविधी झाली.