शहरातील रस्त्यावर दुभाजक व सिग्नल बसवा अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्रआंदोलन करू आरमोरी बचाओ समिती ची मागणी
जिल्हा प्रतिनिधी विभा बोबाटे गडचिरोली
गडचिरोली:आरमोरी शहरात सातत्याने अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत आहे नागपूर गडचिरोली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ व साकोली गडचिरोली राष्ट्रीय महामार्ग हे आरमोरी शहरातून गेले असल्याने शहरातील महामार्गावर मोठ्या प्रमाणात जड वाहनांचे आवागमन वाढलेले आहे या मार्गावर अनेक महाविद्यालयाचे विद्यार्थी व नागरिक मोठ्या प्रमाणात ये-जा करत असतात नुकताच दिनांक १८/१२/२०२४ ला शहरातील आरमोरी बर्डी परिसरात टी पॉइंट येथे भीषण अपघात होऊन किरण संजय गोंदोळे नामक महिला मृत्युमुखी पडली त्यामुळे आरमोरी शहरात सर्वत्र भीतीचे वातावरण पसरलेले आहे शहरातील वडसा रोड टी पॉइंट,नवीन बस स्टॅन्ड, शक्ती नगर पॉईंट, भगतसिंग चौक,संत जगनाडे चौक,येथे सिग्नल व दुभाजक बसवण्याची मागणी तहसीलदार यांच्या माध्यमातुन निवेदन कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग गडचिरोली ,केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आरमोरी बचाव समितीच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे तरी राष्ट्रीय महामार्ग विभागाने त्वरित याची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलेला आहे याप्रसंगी आरमोरी बचाओ समितीचे पदाधिकारी दिलीप हाडगे, विलास गोंदोळे,देवानंद दूमाने, राहुल जुआरे,विभाताई बोबाटे,के.टी. किरणापुरे,विजय सुपारे,मनोज गेडाम,राकेश सोनकुसरे,महेंद्र मने,पंकज इंदुरकर,लीलाधर मेश्राम,रोहित बावनकर,गौरव करंबे,शुभम वैरागडे,सुरज नारनवरे,श्याम सावसाकडे,कमलेश मेश्राम,प्रवीण अंबादे उपस्थीत होते.